छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून आपल्या सगळ्यांचे मनोरंजन केले. या शोमधल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली. या शोमधला जेठालाल आणि बबिताजी यांच्यात असलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालिकेत बबिताजी म्हणजे मुनमुन दत्ता फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. सध्या मुनमुन ही मालिकेतील टप्पू म्हणजेच अभिनेता राज अनदाकटसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. याच दरम्यान जेठालाल म्हणजे दिलीप जोशी यांचा एक जुना व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. हा व्हिडीओ दिलीप जोशी यांच्या एका फॅन क्लबने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत दिलीप जोशींना प्रश्न विचारला जातो की “बबिताजीला डेट करण्याची संधी मिळाली तर त्याचा फायदा घेणार का?”

आणखी वाचा : आपण एवढे श्रीमंत का आहोत? अक्षयच्या मुलाने विचारला होता प्रश्न, ट्विंकल म्हणाली…

आणखी वाचा : सौंदर्य पाहून नाही तर ‘या’ कारणामुळे अभिषेकने केले ऐश्वर्याशी लग्न

यावर उत्तर देत दिलीप बोलतात, “मला जेठालालबद्दल माहिती नाही, पण दिलीप जोशी म्हणून मला डेट करायला आवडणार नाही असं मला म्हणायचं आहे. मी एक विवाहित आणि मी आनंदी आहे. त्यामुळे मला त्याची गरज नाही.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taarak mehta fame jethalal aka dilip joshi on taking babiaji aka munmun dutta on date dcp
First published on: 02-12-2021 at 16:11 IST