‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय शोपैकी एक आहे. हा शो सर्वांत जास्त काळ चालणाऱ्या शोपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राचे प्रेक्षकांमध्ये एक खास स्थान आहे. दिलीप जोशी यांनी जेठालालच्या भूमिकेतून प्रत्येक घरात आपली ओळख निर्माण केली आहे. ते या शोचे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत. चला तर मग जाणून घेऊया ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’साठी प्रत्येक अभिनेत्याला किती मानधन मिळते.
या मालिकेतील मुख्य अभिनेता दिलीप जोशी प्रत्येक भागासाठी लाखो रुपये घेतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते प्रत्येक भागासाठी १.५ ते २ लाख रुपये मानधन घेतात. ते सुरुवातीपासूनच या मालिकेचा भाग आहेत आणि त्यांचे पात्र सर्वांत लोकप्रिय पात्रांपैकी एक आहे.
बापूजींना किती मानधन मिळते?
आता जर आपण दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वांत लोकप्रिय पात्राबद्दल बोललो, तर ते बापूजी आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये बापूजींची भूमिका अमित भट्ट यांनी साकारली आहे. ते प्रत्येक भागासाठी सुमारे ७० ते ८० हजार रुपये घेतात.
मुनमुन दत्ता ही सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री
मुनमुन दत्ताने ‘तारक मेहता’मध्ये बबिताजीची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली. तिने प्रत्येक घरात स्वतःची ओळख निर्माण केली. या मालिकेसाठी अभिनेत्रीला ५०,००० ते ७५,००० पर्यंत मानधन मिळते. अय्यरची भूमिका साकारणारा अभिनेता तनुज महाशब्दे याला प्रत्येक भागासाठी ६५,००० ते ८०,००० इतके मानधन मिळते.
तारक मेहताच्या भूमिकेसाठी शैलेश लोढा चांगले पैसे घेत असत; पण त्याने शो सोडल्यानंतर सचिन श्रॉफने तारकच्या भूमिकेत प्रवेश केला. सचिनला शैलेशपेक्षा खूपच कमी मानधन मिळते. तो प्रत्येक एपिसोडसाठी सुमारे ३०,००० रुपये घेतो.
तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचा चाहतावर्गही मोठा आहे. काही न काही कारणांमळे ही मालिका आणि त्यातील कलाकार चर्चेत असतात. गेली १७ वर्षं प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या मालिकेत आता एका नवीन कुटुंबाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे या नवीन कुटुंबाच्या येण्यानं मालिकेत कोणतं नवीन वळण येणार, तसेच पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.