छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही जोडी तर घराघरात प्रसिद्ध ठरली. या मालिकेत दया बेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७ पासून मालिकेपासून लांब आहे. यामुळे दयाबेन कधी परतणार? असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला आहे. पण आता लवकरच या मालिकेत दयाबेन परतणार आहे. नुकतंच याबाबतचा एक प्रोमो समोर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता या मालिकेत दया बेन परत येणार असल्याची चर्चा सुरु आहे. नुकतंच याबाबतचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोत दयाबेन ही लवकरच गोकुलधाम सोसायटीमध्ये परत येत असल्याचे दिसत आहे. यात जेठालाल हा सुंदरलालसोबत फोनवर बोलत असल्याचे दिसत आहे. त्यात सुंदरलाल सांगतो की, दयाबेन लवकरच मुंबईत येणार आहे. मी स्वत: तिला घेऊन येणार आहे. त्याचवेळी गोकुलधामच्या गेटवर एक गुजराती महिला साडी घालून चालत असल्याचे दाखवण्यात आले आहे. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून दयाबेन असल्याचा अंदाज चाहते लावत आहेत.

‘तारक मेहता…’ मालिकेत परतण्यासाठी दयाबेन सज्ज, निर्माते म्हणाले “आम्ही योग्य वेळेची…”

सुंदरलालने दिलेली ही खूशखबर ऐकून जेठालाल आणि गडा कुटुंबातील सर्व सदस्य फार खूश असल्याचे दिसत आहे. पण दयाबेन हे पात्र कोण साकारणार? याचा मात्र अद्याप उलगडा झालेला नाही. दिशा वकानी ही कमबॅक करणार की नाही? याबाबतही अद्याप प्रश्नचिन्ह आहे. मात्र दयाबेन परत येणार असल्याचे कळताच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

“मला अनेकदा जुलाब, उलट्या व्हायच्या”, प्राजक्ता माळीने सांगितला ‘रानबाजार’ च्या शूटींगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१७ मध्ये दिशा प्रसूती रजेवर गेली होती. तेव्हापासून ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेपासून लांब असल्याचे पाहायला मिळाले. यानंतर काही महिन्यांनी दिशाने मालिकेचा कायमचा निरोप घेतला. या मालिकेच्या निर्मात्यांनी तिच्या जागी नवी अभिनेत्री शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ते अयशस्वी ठरले. त्यामुळे आता दिशाऐवजी ‘दया बेन’च्या अवतारात कोणती अभिनेत्री येणार आणि चाहत्यांकडून तिला कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.