Dilip Joshi Talks About Chemistry Between Jethalal and Babita Ji : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका अनेक वर्षांपासून टीव्हीवर राज्य करत आहे. ही मालिका लोकांना खूप आवडली आहे आणि या मालिकेतील प्रत्येक पात्र घरात प्रसिद्ध आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये जेठालाल आणि बबिताजींची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली आहे. या मालिकेला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आता या मालिकेतील मुख्य पात्र जेठालालने बबिताजींबरोबरच्या त्याच्या केमिस्ट्रीबद्दल सांगितले. त्याने सांगितले की, तो दोघांच्या केमिस्ट्रीची खूप काळजी घेतो.
दिलीप जोशी यांनी सांगितला एक किस्सा
जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी एका मुलाखतीत म्हणाले, “एक अभिनेता म्हणून माझा नेहमीच हा प्रयत्न असतो की, अश्लीलता आणि निरागसता यांच्यात एक बारीक रेष असते, ती कधीच न ओलांडण्याची काळजी आम्ही घेतो.”
शोमधील एका संस्मरणीय घटनेची आठवण करून देताना दिलीप म्हणाले, “सुरुवातीला आम्ही अहमदाबादला शूटिंगसाठी गेलो होतो आणि एका वृद्धाश्रमात गेलो होतो. तिथे बरेच वृद्ध लोक होते. त्यांनी मला सांगितलं की, त्यांना ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो खूप आवडतो आणि मी ज्या प्रकारे बबिताजी हा डायलॉग म्हणतो, तो त्यांना खूप आवडतो.”
दिलीप पुढे म्हणाले, “जर तुम्ही समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे खूप वेगळे नातं आहे आणि लोक ते स्वीकारत आहेत. कारण- त्यात निरागसता आहे. एक अभिनेता आणि पटकथा लेखक म्हणून, आम्ही योग्य दिशेने आहोत.”
शोमध्ये दोघांचीही भूमिका खूप मजेदार आहे. जेठालालला बबिताजी आवडतात; पण ते कधीही चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलेले नाही. म्हणूनच चाहत्यांना दोघांची जोडी आवडते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटातील लोक ही मालिका आवडीने बघत असल्याने याबद्दलची विशेष काळजी निर्मात्यांनी घेतली आहे.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा सब टीव्हीचा प्रसिद्ध शो अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचा आवडता आहे. या शोने टीआरपी यादीतही आपले स्थान कायम ठेवले आहे. या शोमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी त्याला निरोप दिला आहे. काही दिवसांपासून दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता गायब असल्याने त्यांनी ही मालिका सोडल्याची जोरदार चर्चा होती. परंतु, नंतर निर्मात्यांनी स्पष्ट केले की, दोघांनीही वैयक्तिक कारणांसाठी कामातून सुट्टी घेतली होती.