‘तारक मेहता…’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, निर्मात्यांनी केली मोठी घोषणा

‘महासंगम शनिवार’ स्पेशल या कार्यक्रमाच्या निमित्ताने निर्मात्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

taarak mehta ka ooltah chashmah,
'महासंगम शनिवार' स्पेशल या कार्यक्रमाच्या निमित्ताने निर्मात्यांनी ही घोषणा केली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून आपलं मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी दसऱ्याच्या दिवशी चाहत्यांना एक खास भेट दिली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका आठवड्यात ५ वेळा प्रदर्शित होत होती. मात्र, आता ही मालिका आठवड्यात ५ वेळा नाही तर ६ वेळा प्रदर्शित होणार आहे. याचाच अर्थ आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका आपल्याला सोमवार ते शनिवार पाहायला मिळणार आहे. ही बातमी सोनी सब चॅनेलने ‘महासंगम शनिवार’ स्पेशलच्या कार्यक्रमाच्या घोषणेसह हे ही आनंदाची बातमी दिली आहे.

आणखी वाचा : “डिलिव्हरीच्या वेळी ऐश्वर्याने…”; अमिताभ यांनी केलेला तो खुलासा

आणखी वाचा : “जरा दोन दिवस…”, ऋतुराजच्या सामन्या आधी नेटकऱ्यांनी सायलीला दिला सल्ला

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या चाहत्यांमध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी ‘तारक मेहता…’ मालिकेतील नट्टू काका यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah makers big decision good news for viewers dcp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या