‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील बबीताजी आणि टप्पू सध्या चांगलेच चर्चेत आहेत. खऱ्या आयुष्यात अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. सोशल मीडियावरही दोघांच्या अफेरच्या चर्चांना उधाण आलंय. मुनमुन आणि राजच्या अफेरच्या चर्चांनंतर जेठालालला मोठं दु:ख झालं असेल असं म्हणत सोशल मीडियावर मीम्स देखील व्हायरल होवू लागले होते.

‘तारक मेहता…’मालिकेत जेठालाल बबीताजीला पसंत करत असल्याचं दाखवण्यात आलंय. तर जेठालालच्या मुलाची म्हणजेच टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट बबीचताजी म्हणजेच मुनमुन दत्ताला डेट करत असल्याच्या चर्चा आहे. राज मुनमुनपेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे. नुकतेच मुनमुन दत्ताने आपल्या कुटुंबासोबत गणेशोत्सव साजरा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे.

हे देखील वाचा: कतरिनासोबत साखरपुडा झाल्याच्या चर्चांवर ‘अशी’ होती विकीच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले होते…

 

View this post on Instagram

 

A post shared by (@mmoonstar)

हे देखील वाचा: दीपिका-रणवीरच्या रोमांसमुळे बिग बी पडले होते पेचात, अमिताभ बच्चन यांनी शेअर केला ‘तो’ भन्नाट किस्सा

मुनमुन दत्ताच्या या फोटोंवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी ‘टप्पू कुठे आहे ?’ असा सवाल विचारत मुनमुनवर निशाणा साधला. तर एक युजर म्हणाला, “बबीता तेजेंद्र गडा” दुसऱा युजर म्हणाला, “तुम्ही जेठालालसोबत चुकीचं केलंत”. आणखी एक युजर म्हणाला, “तुमच्या चर्चा रंगत आहेत सध्या बाजारात”

munmun
(Photo-Instagram@mmoonstar)

अनेक नेटकऱ्यांनी मुनमुनला टप्पू आणि तिच्या रिलेशनशिपवरून ट्रोल केलंय. अनेकांनी बबीता आणि टप्पूने जेठालालला फसवल्याचं म्हणत थट्टा केली आहे.