करोनानंतर तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सूर्या (Suriya) आणि त्याची पत्नी, अभिनेत्री ज्योतिका यांनी मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मुलांनी मुंबईतील शाळेत प्रवेश घेतला असून, ज्योतिका आता मुंबईतच राहते. सध्या सूर्या त्याच्या आगामी ‘कंगुवा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत सूर्याने मुंबईत स्थायिक होण्याच्या निर्णयाबाबत सविस्तर माहिती दिली. मुंबईत त्याच्या कुटुंबाला साधेपणाने जीवन जगण्याचा आनंद मिळतो आणि त्याच्या मुलांना सामान्य मुलांप्रमाणे बालपण अनुभवता येतं, असं सूर्याने सांगितलं.

मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय

‘हॉलिवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सूर्याने या निर्णयाचे कारण स्पष्ट करताना म्हटलं, “ज्योतिका चेन्नईत १८-१९ व्या वर्षी आली आणि तिने तेथे २७ वर्षे घालवली. ती तिचे करिअर, मित्र आणि तिचं मुंबईतील वांद्र्याचं लाइफस्टाइल सोडून माझ्या कुटुंबासह राहिली. कोविडनंतर आम्हाला बदलाची गरज वाटली. तिचं करिअर एका स्थिरावलेल्या टप्प्यावर पोहचलं होतं, म्हणजे तिच्या करिअरमध्ये तिला एकसारख्याच भूमिका मिळत होत्या. तिच्या वाट्याला येणाऱ्या सिनेमाचं लेखन एकसुरी वाटू लागलं होतं. महिलाविषयक कथा आणि भूमिका निर्माण होण्यासाठी मंच उपलब्ध नव्हता, त्यामुळे आम्ही ‘2D एंटरटेनमेंट’ची स्थापना केली”

हेही वाचा…Video : अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ कृतीने दाक्षिणात्य पुरस्कार सोहळ्यात वेधले चाहत्यांचे लक्ष; व्हिडीओ व्हायरल

सूर्याने पुढे सांगितलं, “मी नेहमीच अनुभवी दिग्दर्शकांबरोबर काम करतो, परंतु ज्योतिका अनेकदा नवोदित दिग्दर्शकांबरोबर काम करते, त्यामुळे तिला नेहमी अधिक आव्हानांचा सामना करावा लागतो. मुंबईत स्थायिक झाल्यापासून तिने ‘श्रीकांत’, ‘शैतान’, ‘डब्बा कार्टेल’ आणि ‘काथल: द कोर’ यांसारख्या विविध सिनेमांत काम केलं आहे. तिच्या या नव्या सिनेमांचं लेखन अधिक रंजक आणि चांगलं आहे.”

या स्थलांतरामुळे ज्योतिका आणि त्यांच्या कुटुंबाच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल झाला आहे. सूर्या म्हणाला, “मुंबईत तिच्या पालकांबरोबर वेळ घालवताना ती आनंदी आहे. मला जाणवलं की, पुरुषांप्रमाणेच महिलांनादेखील सुट्टी, मैत्री, आर्थिक स्वावलंबन यासह फिटनेससाठी वेळ हवा असतो. तिच्या कुटुंबासह वेळ घालवण्याचा तिचा हक्क का हिरावून घ्यावा? ‘मी, माझं’, या मानसिकतेतून आपण बाहेर येण्याची गरज आहे. तिच्या अभिनेत्री म्हणून होणाऱ्या प्रगतीवर मला आनंद आहे आणि ती आणखी सुंदर संधी शोधेल अशी अपेक्षा आहे.”

हेही वाचा…सीन खरा वाटावा यासाठी रणवीर सिंहने केला प्रयोग, पण घडलं भलतंच; हेलिकॉप्टरने न्यावं लागलेलं रुग्णालयात

मुंबईतील शांत जीवन

सूर्याने सांगितलं की, मुंबईत राहिल्याने त्याला आपल्या मुलांसह वेळ घालवण्याची संधी मिळते. “माझ्या मुलांना आयबी शाळेत प्रवेश मिळाला आहे आणि चेन्नईत अशा फारच कमी शाळा आहेत. मुंबईत आम्हाला चांगल्या संधी दिसल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. मी चेन्नई आणि मुंबईत समतोल साधत असतो, महिन्यातून किमान १० दिवस शूटिंगमधून सुट्टी घेतो. या दिवसांमध्ये मी पूर्णपणे डिस्कनेक्ट राहतो, ना काम, ना फोन कॉल फक्त मुंबईतील शांतीचा अनुभव मी घेतो.”

हेही वाचा…अमिताभ बच्चन यांच्यावर कर्ज झाल्याने अभिषेक बच्चनला सोडाव लागलं होत शिक्षण; म्हणाला, “स्टाफकडून पैसे घेण्याची वेळ…”

कुटुंबाबरोबरचा वेळ

सूर्याने तो आता कुटुंबाबरोबर कसा वेळ घालवतो हे सांगताना तो म्हणाला, “माझ्या मुलांना रस्त्यावर चालणं, खेळणं आणि इतरांशी संवाद साधणं खूप महत्त्वाचं आहे. मला आनंद आहे की, माझ्या मुलांना आता हे स्वातंत्र्य मिळालं आहे. मलाही त्यांच्याबरोबर या गोष्टी करून वेळ घालवता येतो.”

हेही वाचा…‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात होते देव आनंद, तिने आजीमुळे दिलेला नकार, नंतर आयुष्यभर राहिलेली अविवाहित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूर्या आणि ज्योतिका यांची भेट १९९९ मध्ये ‘पूवेल्लम केत्तुप्पर’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. २००६ मध्ये त्यांचं लग्न झालं आणि त्यानंतर २००७ मध्ये त्यांच्या मुलीचा दियाचा जन्म झाला; तर २०१० मध्ये त्यांचा मुलगा देव जन्मला.