तामिळ चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमध्ये एक नाव कायमच चर्चेत असते ते नाव म्हणजे सूर्या. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘जय भीम’ चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्यासाठी त्याचे कौतुकदेखील झाले होते. दक्षिणेतील या सुपरस्टारलादेखील आता मुंबईच्या भुरळ पडली आहे. लवकरच तो आता मुंबईकर होणार आहे. त्याने मुंबईत आलिशान घर विकत घेतले आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीत आज कित्येक कोटींची उलाढाल होते. शेअर मार्केटपासून ते बॉलिवूडपर्यंत, याच शहरात देशभरातून लोक काम करण्यासाठी येतात. आता दाक्षिणात्य स्टार्सदेखील मुंबईत स्थलांतरित होत आहेत. अभिनेता सूर्याने मुंबईतील एका प्रख्यात ठिकाणी असलेल्या इमारतीमध्ये एका सदनिका विकत घेतली आहे. या सदनिकेची किंमत ६८ कोटी रुपये असून उर्वरित २ कोटी रुपये बुकींग आणि इतर औपचारिकतेसाठी खर्च करण्यात येणार आहेत. इंडियाग्लिट्झने ही माहिती दिली आहे.
“त्यांना काम आवडले पण…” वेबसीरिजसाठी नकार मिळाल्याने सुप्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत
ही इमारत ९००० चौरस फूट क्षेत्रफळावर बांधली गेली आहे. तसेच या इमारतीमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आणि राजकारणी यांनी सदनिका घेतली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार सूर्या त्याची पत्नी अभिनेत्री ज्योतिका आणि मुलांना घेऊन मुंबईत स्थलांतरित होण्याच्या विचारात आहे. मुंबईत अनेक संधी मिळत असल्याने त्याचा असा विचार आहे. या दाम्पत्याला दोन मुले असून दिया आणि देव अशी त्यांची नाव आहेत.
सूर्या नुकताच ‘नाम्बी नारायण’ या आर माधवनच्या तामिळ व्हर्जनमध्ये दिसला होता. ‘सूरराई पोत्रू’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच लवकरच त्याचा सुरिया ४२ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.