‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला आहे. तनुश्रीच्या या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये हे प्रकरण चांगलंच गाजल असून अनेक कलाकारांनी नानांची पाठराखण केली. यात अभिनेत्री राखी सावंतने देखील नानांची बाजू घेत तनुश्रीवर आरोप केले होते. या आरोपानंतर तनुश्रीने राखीवर अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

ज्या दिवशी हा प्रकार झाला त्यावेळी तनुश्री व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्जच्या नशेत बेशुद्ध होऊन पडली होती, असं वक्तव्य राखीने केलं होतं. या वक्तव्यानंतर तनुश्रीने राखीला प्रत्युत्तर देत तिच्यावर १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटातील एक गाणं राखी सावंतने केलं असून यापूर्वी हे गाणं तनुश्री करणार होती. परंतु ऐनवेळी तनुश्रीने नकार दिल्यामुळे या गाण्यासाठी राखीची निवड करण्यात आली होती.

दरम्यान, नाना -तनुश्री वाद रंगत असताना अनेक कालाकारांनी नानांची पाठराखण केली. यात राखीने देखील नानांना पाठिंबा देत तनुश्रीवर आरोप केले होते. विशेष म्हणजे या वादानंतर सध्या #metoo ही मोहीम सुरु झाली असून अनेक महिलांनी या मोहिमेच्या माध्यमातून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.