Tara Sutaria Confirms Dating Veer Pahariya Hints At Marriage : बॉलीवूड अभिनेत्री कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांच्याबद्दल अनेक बातम्या येत असतात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
तारा सुतारिया तिच्या नात्यामुळे सध्या चर्चेत आहे. या अभिनेत्रीचे नाव ‘स्काय फोर्स’ चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या अभिनेता वीर पहारियाशी जोडले जात आहे. दोघेही अनेक वेळा एकत्र दिसले होते, त्यानंतर तारा आणि वीर डेटिंग करत असल्याची चर्चा आहे.
अलीकडेच, अभिनेत्रीने रणवीर इलाहाबादियाशी बोलताना तिच्या नात्याबद्दल मौन सोडले. ‘स्टुडंट ऑफ द इयर २’फेम अभिनेत्री तारा सुतारियाने तिच्या नात्याची पुष्टी केली आणि सांगितले की ती तिच्या नात्यामध्ये खूप आनंदी आहे. तिने वीर पहारियाचे नाव घेतले नाही.
तिच्या अफवांच्या नात्याला दुजोरा देताना तारा सुतारिया म्हणते, “मी सध्या खूप आनंदी आहे. मी खूप चांगल्या स्थितीत आहे, जिथे मला खूप आनंद होत आहे.” रॅम्प वॉकदरम्यान तारा सुतारियाने वीर पहारियाला फ्लाइंग किस दिल्याने या जोडप्याच्या नात्याची चर्चा अधिकच वाढली. अभिनेत्री अलीकडेच एपी ढिल्लनबरोबर एका म्युझिक अल्बममध्ये दिसली होती, ज्याच्या फोटोवर वीरच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
ताराने आदर जैनबरोबरच्या ब्रेकअपवर सोडलं मौन
एक्स बॉयफ्रेंड आदर जैनबरोबरच्या ब्रेकअपबद्दल बोलताना तारा म्हणते, “मला वाटतं मी स्वतःलाही ओळखत होते. जसे आपण सर्व जण २० च्या दशकात असतो, तसेच तुम्हालाही २० च्या दशकात खूप काही समजते. चुका झाल्या असे मी म्हणू शकते की नाही हे मला पूर्णपणे माहीत नाही.”
ती पुढे म्हणते, “जर मी स्वतःबद्दल बोलले तर मला खात्री नाही की चुका झाल्या होत्या. २० च्या दशकात मी जे काही केले त्याचा मला अभिमान आहे. मला माहीत आहे की मी वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या काय केले.”
तारा सुतारिया आणि आदर जैन बराच काळ एकमेकांना डेट करत होते. ही अभिनेत्री करीना कपूरच्या चुलत बहिणीबरोबर तिच्या फॅमिली लंचमध्येही दिसली होती. पण, अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर हे जोडपे वेगळे झाले आणि आदर जैनने यावर्षी अलेखा अडवाणीशी लग्न केले. अभिनेत्याने त्याच्या लग्नादरम्यान तारा सुतारियाबद्दल टाईमपास कमेंट केली होती, ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
तारा सुतारियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘बेस्ट ऑफ लक निक्की’, ‘ओये जस्सी’ आणि ‘द सूट लाईफ ऑफ करण अँड कबीर’सारख्या लोकप्रिय टीव्ही मालिका केल्या होत्या. तसेच ‘अपूर्वा’, ‘स्टुडंट ऑफ द इयर २’, ‘हिरोपंती २’, ‘मर जावां’, ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.