दयाबेनचा नवा लूक पाहून चाहते चिंतेत, अभिनेत्रीला ओळखणं ही झालं कठीण

तिच्या चेहऱ्यावर थकवाही पाहायला मिळत आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांना त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले पात्र म्हणजे दयाबेन. अभिनेत्री दिशा वकानी ही दयाबेनची भूमिका साकारत होती. दिशाने काही वर्षांपूर्वी ही मालिका सोडली असली तरी तिची लोकप्रियता अद्याप कमी झालेली नाही.

दिशाने मालिका सोडल्यानंतर तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. ती कुठे आहे? काय करते, याचा शोध नेटकरी नेहमीच घेत असतात. नुकतंच दिशाचा आणखी एक फोटो व्हायरल झाला आहे. यात दिशा ही तिच्या बाळाला घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. तिचा हा फोटो नो मेकअप लूकमधील आहे. तिचा हा फोटो पाहून तिचे वजनही काहीसे वाढलेले दिसत आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावर थकवाही पाहायला मिळत आहे.

‘तारक मेहता…’ मालिकेत दिसणार नवीन नट्टू काका?; पाहा फोटो

तिच्या या लूकमध्ये तिला ओळखणं ही फार कठीण झालं आहे. दरम्यान दिशाचा हा फोटो तिच्या एका फॅन क्लबने पोस्ट केला आहे. त्यामुळे ती प्रत्यक्ष अशी दिसते का की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत अभिनेत्री दिशा वकानीने दयाबेन ही भूमिका साकारली आहे. पण गेल्या तीन वर्षांपासून दिशा मालिकेत दिसत नाही. त्यामुळे दयाबेनला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. ती पुन्हा कधी मालिकेत दिसणार असे अनेकदा निर्मात्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारले जाते.

२०१७ मध्ये दिशा मॅटरनिटी लीव्हवर गेली होती. तेव्हापासून ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेपासून लांब असल्याचे पाहायला मिळाले. यानंतर काही महिन्यांनी दिशाने मालिकेचा कायमचा निरोप घेतला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tarak mehta ka ooltah chashmah dayaben fame actress disha vakani photos viral nrp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती