वादग्रस्त लिखाणामुळे चर्चेत राहणाऱया बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. स्वतः तस्लिमा नसरीन यांनीच ट्विटरवरून याबद्दल माहिती दिली.
ट्विटवर त्या लिहितात, मी बिग बॉसमध्ये सहभागी व्हावे, यासाठी कलर्स वाहिनीकडून फोन आला होता. पण मी त्यांना नम्रपणे नकार दिला. त्यानंतर त्यांनी तुम्हाला स्वतःला जगासमोर विचार मांडण्याची संधी मिळेल. सोबत पैसेही मिळतील, असे सांगितले. त्यानंतर तर मी स्पष्टपणे त्यांना नाहीच म्हणून सांगितले.
तस्लिमा नसरिन सध्या भारतामध्ये राहात असून, त्याचा व्हिसा येत्या १७ ऑगस्टला संपतो आहे. त्यांनी व्हिसाची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे. पुढील महिन्यापासून बिग बॉसचे नवे पर्व सुरू होण्याची शक्यता आहे. ज्यांची पार्श्वभूमी वादग्रस्त आहे, अशा सेलिब्रिटिंना या पर्वात आमंत्रित करण्याचे नियोजन आहे.
तस्लिमा नसरीन यांनी गेल्या आठवड्यात गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना निवासी व्हिसा देण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Aug 2014 रोजी प्रकाशित
‘बिग बॉस’लाही तस्लिमा नसरीन यांचा झटका
वादग्रस्त लिखाणामुळे चर्चेत राहणाऱया बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.

First published on: 04-08-2014 at 03:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taslima nasreen refuses to join big boss