अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा बहुचर्चित ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाशी निगडीत काहीतरी अपडेट येणार असल्याची चर्चा कालपासून रंगत होती. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टी सिरिजच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर हा टीझर प्रदर्शित झाला आहे, हृतिक आणि सैफ या दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

१ मिनिटं ५५ सेकंदांच्या या टीझरमध्ये हृतिक आणि सैफ यांच्यातली जुगलबंदी प्रेक्षकांना बघायल मिळत आहे. दोघेही पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसल्याने त्यांचे चाहते भलतेच खुश झाले आहेत. या दोघांबरोबर अभिनेत्री राधिका आपटेची झलकसुद्धा यात आपल्याला बघायला मिळेल.

हा चित्रपट मुळ दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. मुळ चित्रपटात माधवन आणि विजय सेतुपती यांच्यातली जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळाली तर या रिमेकमध्ये बॉलिवूडच्या या २ अभिनेत्यांचा अभिनय आपल्याला बघायला मिळणार आहे.

आणखीन वाचा : आमिरच्या चित्रपटाचं कौतुक करणं हृतिकला पडलं महागात, सोशल मीडियावर ‘बॉयकॉट विक्रम वेधा’ ट्रेंड व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लवकरच या चित्रपटाचा ट्रेलरही बघायला मिळेल अशी शक्यता आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान ‘विक्रम वेधा’चा ट्रेलरही बघायल मिळू शकतो असं म्हंटलं जात आहे. हृतिक रोशनने आमिरच्या चित्रपटाचं कौतुक केलं त्यामुळे हा चित्रपटही बॉयकॉट करा हा ट्रेंड चांगलाच व्हायरल झाला होता. पण हा टीझर पाहून सोशल मीडियावर प्रेक्षक यांची प्रशंसा करताना दिसत आहेत. येणाऱ्या वर्षात हृतिक वॉर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही दिसू शकतो अशी शक्यता आहे.