‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेने घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. नुकतेच तेजश्री ही शर्मन जोशीसोबत ‘मै और तुम’ या हिंदी नाटकामध्ये काम करणार असल्याचे आपल्याला कळले होते. पण, तेजश्री केवळ हिंदी नाटकातचं नाही तर हिंदी चित्रपटातही काम करणार असल्याची माहिती समोर आलीयं.
‘कार्टी काळजात घुसली’ या व्यावसायिक नाटकाने तेजश्रीने वर्षाभरापूर्वी मराठी नाट्यसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर आता तिने चक्क बॉलीवूडमध्येच उडी मारली असून ती शर्मन जोशीसोबत ‘सायोनारा फिर मिलेंगे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय वर्मा हे करत आहेत. नुकताचं या चित्रपटाचा मुहुर्त मुंबईतील बप्पी लहरी स्टुडिओत करण्यात आला.
तेजश्रीने यापूर्वी ‘झेंडा’ आणि ‘लग्न पाहावे करून’ या मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते. ‘सायोनारा फिर मिलेंगे’ हा चित्रपट मिळाल्याने तेजश्री खूप खुश आहे. या चित्रपटात अतुल कुलकर्णी आणि रुतु सचदेवा यांच्याही भूमिका आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 29th Apr 2016 रोजी प्रकाशित
कार्टी ‘बॉलीवूड’मध्ये घुसली!
तेजश्री केवळ हिंदी नाटकातचं नाही तर हिंदी चित्रपटातही काम करणार
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 29-04-2016 at 12:13 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tejashri pradhan to debut in bollywood movie