आदेश बांदेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीचे अभिनेते म्हणून ओळखले जातात. नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. जवळपास १९ वर्ष ते ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमांतून महाराष्ट्रातील घराघरांत भेट देत आहेत. “बांदेकर पैठणी घेऊन आले…” अशी त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाची घडी व्यवस्थित सांभाळून पुढे ते राजकारणात सक्रिय झाले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नेमकी केव्हा सुरूवात झाली? याबाबतचा प्रवास त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला आहे.

हेही वाचा : मराठमोळ्या केतकी माटेगावकरचं नशीब उजळलं; सुपरस्टार अल्लू अर्जुनबरोबर झळकली जाहिरातीत, अनुभव सांगत म्हणाली…

‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाने २० व्या वर्षात पदार्पण केल्यामुळे सध्या आदेश बांदेकर विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी आदेश बांदेकरांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. ते म्हणाले, “माझा पहिल्यापासून कार्यकर्त्याचा पिंड होता…मला करोडो रुपयांची संधी मिळाली, तरी मी तुम्हाला कायम लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत अंगावर गुलाल टाकून नाचताना दिसेन. माझा जन्म अलिबागमध्ये झाला आणि पुढे काही काळानंतर माझे आई-वडील गिरणगावात आले. त्याच ठिकाणी पहिल्यांदा वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं पहिलं शब्द कानावर पडलं. त्यांच्या दसऱ्या मेळाव्याला मी लहानपणापासून ढोल वाजवत जायचो. राजकारण हा विषय माझ्यासाठी नव्हता पण, एका कार्यकर्ता, मित्र, अर्ध्या रात्री उठून मदतीला जाणं हे माझ्या रक्तात होतं.”

हेही वाचा : “माझे फोटो पॉर्नोग्राफिक साइटवर…”, जान्हवी कपूरने सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाली, “माझे मित्र-मैत्रिणी…”

आदेश बांदेकर पुढे म्हणाले, “राजकारणात येईन, एवठा सक्रिय होईन असं खरंच वाटलं नव्हतं पण, एक दिवस मला लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत असताना रात्री फोन आला. फोन उचलल्यावर बाळासाहेबांना बोलायचंय असं आवाज समोरून आला…आणि मला काहीच कळालं नाही. ते सगळं माझ्यासाठी स्वप्नवत होतं. ते म्हणाले, ‘मला भेटायचंय कधी येतोस?’ आमचं फोनवर बोलणं झालं आणि पुढे त्यांना भेटायला मी गेलो. पहिल्यांदा उद्धवजींना भेटलो. त्यांच्यातील माणूसपण मला आजही भावतं. त्यांच्याशी बोलून मी पक्षाच्या कामाला सुरुवात केली.”

हेही वाचा : नितीन देसाई यांच्या N.D Studio मध्ये होतंय अक्षरा-अधिपतीच्या लग्नाचं शूटिंग, अनुभव सांगत दोघं म्हणाले, “हा सेट…”

View this post on Instagram

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एके दिवशी प्रचाराला निघताना मला पुन्हा एकदा हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोन आला. त्यांचा निरोप ऐकल्यावर मी मातोश्रीवर पोहोचलो. त्यांनी माझ्या कपाळावर टिळा लावला आणि ते म्हणाले…तुला दादर. मला काहीच माहित नव्हतं. सगळीकडे बातम्या सुरु झाल्या. त्या दिवसापासून निवडणुकीला फक्त १३ दिवस बाकी राहिले होते. माझ्यासमोर आलं आव्हान ते मी स्वीकारलं. पुढे निकाल लागला आणि दुसरा पक्ष जिंकला. त्यावेळी एक आजोबा मला भेटले ते म्हणाले, ‘आदेश आकड्यांच्या गणितात पडलास पण, आमच्या मनात तुझं स्थान उंचावलेलं आहे’ असं त्यांनी मला सांगितलं. त्या घटनेनंतर बाळासाहेबांनी मला बोलावून घेतलं…मला सावरलं, ‘आदेश पाहिजे ती मदत पक्ष करेल फक्त चेहऱ्यावरचं हसू कमी होऊ देऊ नकोस.’ मी त्यांना म्हटलं फक्त आशीर्वाद द्या बाकी नको. त्यांनी मला स्वत:च्या कुटुंबाप्रमाणे मदत केली.” असा अनुभव आदेश बांदेकर यांनी सांगितला.