गेल्या ४ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा नवा प्रवास लवकरच सुरू होणार आहे. १८ मार्चपासून मालिका दुपारी २.३० वाजता पाहायला मिळणार आहे. पण मालिकेच्या नव्या प्रवासात आशुतोष केळकरचा मृत्यू दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आशुतोष साकारणारा अभिनेता ओमकार गोवर्धनची एक्झिट झाली आहे. यानिमित्ताने अनिरुद्ध अर्थात मिलिंद गवळी यांनी ओमकारसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे; जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

मिलिंद गवळी यांची पोस्ट

‘ओमकार गोवर्धन’ याने आशुतोष केळकर या भूमिकेची कात टाकली. तीन, साडेतीन वर्षांपूर्वी ‘आई कुठे काय करते’या मालिकेमध्ये अरुंधती दुसरं लग्न करणार तिच्या आयुष्यामध्ये एक नवीन कॅरेक्टर इंट्रोड्युस होणार याची उत्सुकता होती. अचानक एक दिवस ओंकार गोवर्धन आणि माझी गाठ आमच्या ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर जिन्यामध्ये झाली. मी ओमकारला पाहिल्या पाहिल्या म्हटलं अरे आपण तर आधी भेटलो आहोत. गजेंद्र अहिरे यांनी मला एकदा त्याच्या सिनेमाच्या ट्रायल शोसाठी बोलावलं होतं तो सिनेमा होता ‘निळकंठ मास्तर’. त्या ‘निळकंठ मास्तर’च्या भूमिकेमध्ये ओमकार गोवर्धन होता आणि मला त्याचं काम अतिशय आवडलं होतं. तोच मुलगा आता माझ्यासमोर आशुतोष केळकरच्या भूमिकेसाठी ‘आई कुठे काय करते’मध्ये आला होता. मला त्याला बघून आनंद झाला. कारण माझा नमितावर खूप विश्वास आहे. तिचं कास्टिंग कधी चुकत नाही. मी ओमकारला शुभेच्छा दिल्या आणि त्याला म्हटलं, “वा मजा येणार आता , मला खात्री आहे तू छानच काम करशील.” आणि अगदी तसंच झालं ओमकारने इतक्या प्रामाणिकपणे, इतक्या छान पद्धतीने आशुतोष केळकर ही भूमिका निभावली, की तो सगळ्यांचा लाडका झाला.

मी आणि आप्पा ज्या मेकअपरूम मध्ये होतो त्याच मेकअप रूममध्येच ओमकारची सोय करण्यात आली, आणि ओमकार आल्या दिवसापासून त्या मेकअप रूममध्ये फक्त कला, मस्ती व हास्य रसाचा वर्षाव झाला. विनोदबुद्धी काय असते हे ओमकारकडून शिकावं. सतत प्रसन्न राहणे, हसत राहणे आणि समोरच्याला हसवत राहणे हा त्याचा हातखंडा. पण एकदा का स्क्रिप्ट हातात आली की ती पाठ करायची, त्याच्यावर म्हणून चिंतन करत राहायचं, डोक्यात जितके प्रश्न येतात ते दिग्दर्शकाला विचारून त्याचा निरसन करायचं, एखाद्याचं वाक्य चुकलं, शब्द चुकला किंवा त्याचा अर्थ बदलला, तर प्रथम त्याला ते लक्षात यायचं. पाठांतराच्या बाबतीत त्याचा हात कोणीच धरू शकत नव्हतं. त्याची तर असंख्य सिनेमांची गाणी सुद्धा तोंड पाठ असायची. कधी कधी मेकअपरूम मध्ये आप्पा, अनीश आणि त्याच्या त्या गाण्यांच्या मैफिली व्हायच्या बरेचदा मी पण त्यात सामील व्हायचो. आता आशुतोष केळकर मालिकेत नसणार याचा मला स्वतःलाच खूप मोठा धक्का बसला आहे. मला माहितीये मी त्याला खूप खूप मीस करणार.

जसे लहानाचे एकत्र मोठे झालेले दोन भाऊ अचानक एक अमेरिकेला शिफ्ट व्हायला निघाला की त्या दुसऱ्या भावाची जी अवस्था होत असेल, तसंच काहीस वाटतं आहे. पण त्याचं भाषेवरचं प्रभुत्व, त्याची अभिनयाची जाण आणि त्याचं प्रोफेशनलिज्म, त्याला आयुष्यामध्ये अजून खूप मोठं करणार अशी माझी खात्री आहे. ओंकारला माझ्या खूप खूप शुभेच्छा…

हेही वाचा – Video: ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाणचा संगीत सोहळ्यात ‘चंद्रा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – राखी सावंतने दुसऱ्या पत्नीला दिलेला सल्ला ऐकून भडकला आदिल खान, म्हणाला, “ती करोना व्हायरस…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिलिंद गवळी यांच्या या खास पोस्टवर ओमकार गोवर्धनने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “तुमच्या या प्रेमाच्या वर्षावाने मी भारावून गेलो आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आपण लवकरच भेटू.”