‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेची नेहमी चर्चा होत असते. तसंच या मालिकेतील प्रत्येक कलाकार त्याच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री कौमुदी वलोकर. गेल्या वर्षी मालिकेत कौमुदीची आरोही म्हणून एन्ट्री झाली होती. आता कौमुदीने साकारलेली आरोही घराघरात पोहोचली आहे. अशा या लोकप्रिय कौमुदीने २०२३च्या वर्षा अखेरीस चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.

अभिनेत्री कौमुदी वलोकरने ३१ डिसेंबर २०२३ला साखरपुडा केल्याची आनंदाची बातमी जाहीर केली होती. “या वर्षाच्या शेवटी आम्ही आमचा नवा अध्याय सुरू करत आहोत,” असं लिहित अभिनेत्रीने साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. पण अभिनेत्री होणारा नवरा नेमका कोण आहे? तो काय काम करतो? जाणून घ्या…

हेही वाचा – नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात ‘शूर्पणखा’च्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री, जाणून घ्या

कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश चौकसे आहे. आकाशने याआधी इन्स्टाग्राम अकाऊंटच्या प्रोफाइलवर ‘आरोहीचा खरा यश’ असं लिहिलं होतं. पण आता त्याने प्रोफाइल बदललं आहे. आकाश हा उच्च शिक्षित आहे. त्याने एज्युकेशनमध्ये पीएचडी केली आहे. कौमुदीचा होणारा नवरा UC Berkeleyसाठी संशोधक म्हणून काम करतो. शिवाय ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशनसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतो. तसंच त्याची स्वतःची वेबसाइट आहे. ज्यावर त्याने अनेक ब्लॉग लिहिले आहेत.

हेही वाचा – ‘या’ मराठी अभिनेत्याला वाटतंय मुंबई लोकलमध्ये हेडफोनची व्हावी सक्ती, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कौमुदीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शाळेत असल्यामुळे अभिनय क्षेत्रात काम करत आहे. ‘शाळा’ चित्रपटाच्या माध्यमातून ती मोठ्या पडद्यावर झळकली होती. त्यानंतर कौमुदी ‘शटर’, ‘व्हायझेड’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘मी वसंतराव’ या चित्रपटात पाहायला मिळाली. तसंच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेपूर्वी ती ‘देवाशप्पथ’ या मालिकेत दिसली होती.