‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून राधा सागरला ओळखले जाते. या मालिकेत राधाने ‘अंकिता’ हे पात्र साकारले होते. राधा सागरने काही दिवसांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. आता तिने तिच्या बाळाची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे.

राधा सागरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिच्या बाळाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने “माझा बाप्पा किती गोड दिसतो”, असे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, म्हणाली “आमच्या आयुष्यातील…”

या व्हिडीओत राधा ही बाळा खेळवत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर बाळाला एक महिना पूर्ण झाल्यावर काढलेला फोटो तिने पोस्ट केला आहे. यानंतर पुढील फोटोत एका बाजूला गणपती आणि दुसऱ्या बाजूला बाळाला छान सदरा लेहंगा परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या सर्व फोटोत राधाने तिच्या बाळाचा चेहरा दाखवलेला नाही.

आणखी वाचा : Video : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आजही राहते चाळीत, गिरगावातील घराजवळ तीन थर लावत फोडली दहीहंडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राधा सागरने १० सप्टेंबर २०२३ रोजी बाळाला जन्म दिला. त्यावेळी तिने एक पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. राधाने लग्नाच्या १० वर्षानंतर आई होण्याचा निर्णय घेतला. या काळात तिने करिअरमधूनही ब्रेक घेतला. आता प्रसूतीनंतर राधा ही तिच्या बाळाच्या संगोपनावर भर देत आहे.