स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेप्रमाणेच त्यातील पात्रावरंही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या मालिकेत अनघा हे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही कायम चर्चेत असते. नवीन वर्षाच्या निमित्ताने अश्विनी महांगडेने एक पोस्ट शेअर केली आहे.
नव्या वर्षाच्या मुहूर्तावर अश्विनीने महत्वाची घोषणा केली आहे. अश्विनीने ‘फ्लाईंग एंजल’ नावाची नवी संस्था सुरु केली आहे. तिने सोशल मीडियावर याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. तिने याबद्दलचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. त्याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
अश्विनी महांगडेची पोस्ट
“बरेच दिवस १ जानेवारी ला नवीन काहीतरी करीत आहोत अशा पोस्ट पाहील्या असतील. सगळ्यांच्या मनात प्रश्न उभे राहिले की आता हे काय नवीन करतात.? मुळात आपल्या माणसांना सोबत घेवून पुढे जाणे याला मी आणि बाबा प्राधान्य देतो. पण जे सोबत आहेत त्यांची कष्ट करण्याची तयारी असायला हवी.
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य. च्या माध्यमातून गेले 3 वर्ष महाराष्ट्रात काम करताना महिलांसाठी विशेष काम करण्याची संधी मिळाली. अनेक अशा महिला ज्यांच्या अंगी कला आहे पणं त्यांना योग्य माणसं भेटत नाहीत जे त्यांच्या कलेला आणखी वेगळ्या माणसांसमोर घेवून जावू शकतात. म्हणून हा घाट घातला आहे.
तुमच्या अंगची कला तुम्हाला पैसे तर कमवून देईल पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे #नाव आणि ते मिळवून देण्याची जबाबदारी आमची. अशा महिला, मुली ज्यांना काहीतरी करायचे आहे पणं नेमके काय करू याचे मार्गदर्शन मिळत नाही तर या माध्यमातून आम्ही उत्तम मार्गदर्शक तुमच्यासाठी आणत आहोत जे तुम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहायला मार्ग मोकळा करून देतील.
आता आम्ही एक पाऊल पुढे आलो आहोत आणि तुम्हीही एक पाऊल पुढे या. स्वतःसाठी जगा. आपल्यातील कलेला जगवा. प्रत्येक पुरूषाने घरातील स्त्री ला तिच्यातील गुणांना वाव मिळावा यासाठी प्रत्येक पुरूषाने तिच्या पाठीशी उभे रहायला हवे.
तुमची बहीण म्हणून मी अश्विनी महांगडे आणि भाऊ म्हणून निलेश बाबा जगदाळे कायम उभे आहोत. अट फक्त एक तुमच्या यशात आम्ही आमचे समाधान शोधू पणं तुम्ही मेहनत करायला कमी पडू नका. सविस्तर लवकरचं बोलूयात आज आत्ता फक्त सर्वांच्या अशीर्वादाने Flying Angel चा लोगो सादर करीत आहोत, असे तिने यात म्हटले आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच अश्विनीने नवीन गाडी खरेदी केली आहे. त्याचे फोटो देखील तिने शेअर केले होते. तिने तिच्या गाडीचा नंबरही शेअर केला होता. तर दुसरीकडे ‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या रंजक वळणावर आहे. अनघा गरोदर असताना अभिषेकने तिचा विश्वातघात केल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतंच अनघाने गोंडस मुलीला जन्म दिल्याचं मालिकेत दाखवण्यात आले आहे. त्यानंतर आता पुढे मालिकेत काय घडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या मालिकेत अनेक उत्कठांवर्धक वळण येत असल्याचे पाहायला मिळत आहेत.