‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘अरुंधती’ या व्यक्तिरेखेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावरही सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात आणि अनेकदा रोजच्या आयुष्यातील घडामोडी त्या चाहत्यांशी याच माध्यमातून शेअर करताना दिसतात. पण जेव्हा काही वेळा सोशल मीडियावरील पोस्टमुळे त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा मात्र त्या अशा युजर्सना सडेतोड उत्तर देताना दिसतात. आताही असंच काहीसं घडलं आहे.

मधुराणी प्रभुलकर यांनी इन्स्टाग्रामवर लेकीबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोला दिलेल्या कॅप्शमध्ये ‘आई आणि मुलीचा व्हेकेशन टाईम’ असं लिहिलं होतं. या फोटोमध्ये मधुराणी आपल्या मुलीबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहेत. पण एका युजरने मात्र याच फोटोवर कमेंट करत मधुराणी यांना त्यांच्या मॉडर्न कपड्यांवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावर मधुराणी यांनी त्याला सडेतोड उत्तर देत त्या युजरची बोलती बंद केली आहे.

Kidnap of priest, ransom, Karnataka, loksatta news,
पाच कोटींच्या खंडणीसाठी पुजाऱ्यासह शिष्यांचे अपहरण, कर्नाटकातून तिघे अटकेत
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
sonam wangchuk s indefinite hunger strike
सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
Shiv Sena Yuva Sena Secretary Dipesh Mhatre
शिवसेना युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांना जीवे ठार मारण्याची धमकी, फलकांवरुन जबाब देण्यासाठी शक्तिप्रदर्शन करत पोलीस ठाण्यात
article about sahyadri sankalp society information
सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचा ‘संकल्प’
Pimpri, Notice to Engineers, Road Repair Works pimpri,
पिंपरी : रस्ते दुरुस्तीच्या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांना नोटीस; काय आहे कारण?
Golden Jackal
Golden Jackal : विक्रोळीत लांडग्यांची दहशत? वनअधिकारी म्हणतात, “तो लांडगा नव्हे तर…”

आणखी वाचा-“’आई कुठे काय करते’मध्ये माझ्या नशिबाने…”, मधुराणी गोखलेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

एका युजरने मधुराणी यांच्या फोटोवर कमेंट करताना लिहिलं, “सभ्य भूमिका केल्यानंतर मॉडर्न लुकमधील फोटो काढून शेअर करण्याचे काय कारण आहे? विवाहित स्त्रिया काहीही असो कुंकू लावतात आणि कुंकू लावल्यामुळे त्यांना कोणी मॉडर्न रोल देणार नाही असे नाही. मालिकेत सभ्य भूमिका केल्यानंतर त्यांच्या आपल्या मुलींना असा आदर्श घालून देणे हे कितपत योग्य आहे? दाक्षिणात्य अभिनेत्री त्यांच्या पारंपरिक पद्धतीच्या वेशभूषा वैयक्तिक आयुष्यात प्रकर्षाने पाळतात.”

madhurani prabhulkar insatagram

यानंतर ट्रोल करणाऱ्या या युजरला उत्तर देताना मधुराणी प्रभुलकर यांनी लिहिलं, “मी वैयक्तिक आयुष्यात काय करायचं हे मला सांगणारे तुम्ही कोण? मराठी परंपरेचा इतका पुळका आहे तुम्हाला मग तुम्ही पाश्चात्य लोकांचा ब्लेझर घालून फोटो का काढलाय? मराठी पेहराव करायला हवा होतात नं” मधुराणी यांच्या या कमेंटनंतर अनेक युजर्सनी कमेंट्स करत मधुराणी यांना पाठिंबा दिला आहे.

आणखी वाचा- “अरुंधतीला गाताना पाहून…”, प्रसिद्ध गायकाने ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीसाठी केली खास पोस्ट

दरम्यान मधुराणी प्रभुलकर शूटिंगमधून छोटासा ब्रेक घेऊन मुलीबरोबर सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. मालिकेमध्ये साडीमध्ये दिसणाऱ्या मधुराणी या फोटोंमध्ये एकदम मॉडर्न लूकमध्ये दिसत आहेत. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.