‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते मिलिंद गवळी हे कायमच चर्चेत असतात. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. या मालिकेमुळेच ते घराघरांत पोहोचले. नुकतंच मिलिंद गवळी यांनी त्यांना वाटत असणाऱ्या भीतीचा खुलासा केला आहे.

मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते इन्स्टाग्रामद्वारे फोटो-व्हिडीओ पोस्ट करत असतात. नुकतंच मिलिंद गवळी यांनी पोस्टद्वारे त्यांच्या भीतीबाबत भाष्य केलं आहे. मिलिंद यांना आपल्याला नाचता येत नाही याची भीती मनात बसली होती. मात्र, त्यांनी ही भीती कशी दूर केली याबाबत खुलासा केला आहे.

मिलिंद गवळींची पोस्ट

“प्रयत्नांती / प्रयत्नार्थी परमेश्वर”
आपल्या लहानपणापासून आपल्या काही धारणा बनत जातात,
प्रत्येकाच्या वेगवेगळ्या धारणा मनामध्ये घट्टपणे बिंबवून ठेवल्या जातात, आणि मग आयुष्यभर त्ते प्रामाणिकपणे त्याचं पालन करत राहतात,
उदाहरणार्थ काही लोकांची स्वतःबद्दलची अशी धारणा असते की त्यांना आयुष्यात ड्राइविंग कधीच करता येणार नाही, मग ड्रायव्हिंग करायच्या ते कधी भानगडीतच पडत नाही, मग ड्रायव्हर आला नाही म्हणून त्याच्यासाठी दोन तास थांबणारी लोकही मी बघितले, आणि माझं उलट होत होतं ड्रायव्हर जर पाच दहा मिनिटे उशिरा आला तर मी गाडीत बसायचो आणि shooting लाल निघून जायचो आणि driver ला त्या दिवशी सुट्टीच द्यायचो, कदाचित म्हणुन बिचारे माझे प्रवीण आणि जितेश कधी उशिरा यायचे नाही.
पण माझ्या मनामध्ये लहानपणापासून वेगळीच धारणा किवा भिती बसली होती “मला नाचता येत नाही”, त्यामुळे लग्नामध्ये वरातीत आणि गणपतीत जसे बिनधास्त नसतात कोणाचं कोणाला काही घेणं देणं नसतं तसा नाच मला येतो पण सिनेमातला नाच हा मला काही जमणार नाही असं माझ्या मनाने ठरवूनच टाकलं होतं आणि त्या पद्धतीनेच मी इतकी वर्ष वावरत होतो. अचानक स्टार प्रवाहने मला perform करायला सांगितलं, दिग्दर्शक वैभव घुगे यांना मी म्हटलं की माझ्या ऐवजी दुसरा कोणीतरी नाचणारा कलाकार घ्या म्हणजे तुमचं काम सोपं होईल, वैभव घुगे म्हणाले की आम्हाला तुम्हीच हवे आहात, मी म्हणालो पण मला नाचता येत नाही, ते म्हणाले ते आम्ही बघून घेऊ, तुम्ही फक्त हो म्हणा.
जीव मुठीत धरून मी हो म्हटलं, complete घाबरलोच होतो,
कारण त्याआधी एका कोरिओग्राफरने मला humiliate केलं होतं. आता तो अनुभव परत नको वाटत. वैभव घुगे स्वतः एवढा विश्वास दाखवतोय म्हटल्यावर , आपण पण प्रयत्न करायला काय हरकत आहे असा विचार करून उतरलो मैदाना.
बघा त्यानंतर तीन वेळा स्टार प्रवाह साठी मी perform केलं आहे.
तर माझ्या सांगायचं उद्देश असा हा की … प्रयत्न केले, आणि correct guide करणारा वैभव घुगे सारखा किंवा अनिल शिंदे सारखा तुम्हाला मिळाला सोहम सारखा तुम्हाला मिळाला तर काहीही अशक्य नाही आहे.
आज पर्यंत मला ज्यांनी ज्यांनी नाचवलं त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. सुबल सरकार, नरेंद्र पंडित ,हबीबा, वैभव घुगे, अनिल शिंदे, शिवम वानखडे, कार्तिक पौल … तुमच्यासारखी माणसं माझ्या आयुष्यात आली नसती तर कदाचित माझे पाय जमिनीवरून वर ऊठले नसते .
पण आता आयुष्यात प्रयत्न करायचे असं मी ठरवलेलं आहे. मग जे होईल ते होईल. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा आणि मग बघा गोष्टी तुम्हाला साध्य होतात की नाही. होतीलच हो का नाही होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. दरम्यान, मिलिंद गवळींनी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक जण कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी त्यांच्या नृत्याचं कौतुक केलं आहे. मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचे फोटो, व्हिडीओ ते सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.