छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. संध्याकाळ झाली की, घरोघरी मालिका या मालिका पाहिल्या जातात. त्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मालिकांमध्ये नेहमीच विविध ट्विस्ट आणले जातात. टीआरपीमध्ये सातत्य राखण्यासाठी लोकप्रिय मालिकांमध्ये नेहमीच चढाओढ सुरू असते. गेली दीड वर्षे जुई गडकरीच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थान कायम राखलं आहे. आता नुकत्याच समोर आलेल्या टीआरपी आकडेवारीनुसार कोणती मालिका कोणत्या स्थानावर आहे जाणून घेऊयात…
मराठी टीआरपी तडका या इन्स्टाग्राम पेजवर दर आठवड्याला मालिकांचा टीआरपी शेअर केला जातो. या यादीनुसार पहिल्या १५ मध्ये ‘स्टार प्रवाह’च्या मालिकांना स्थान मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘ठरलं तर मग’ मालिका या यादीत अव्वल स्थानी आहे. गेल्या दीड वर्षांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेत जुईने सायली हे पात्र साकारलं आहे. तर, या मागोमाग प्रेक्षकांच्या लाडक्या कलाचा नंबर लागतो. ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर तिसरं स्थान कोणत्याही मालिकेने नव्हे, तर ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरने मिळवलं आहे. पुढे, तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ आणि अभिजीत खांडकेकरच्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांचा क्रमांक लागतो.
टॉप – १५ मालिकांची संपूर्ण यादी…
१. ठरलं तर मग
२. लक्ष्मीच्या पावलांनी
३. वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर – बाईपण भारी देवा
४. प्रेमाची गोष्ट
५. तुझेच मी गीत गात आहे
६. घरोघरी मातीच्या चुली
७. सुख म्हणजे नक्की काय असतं
८. साधी माणसं
९. अबोली
१०. ठरलं तर मग महाएपिसोड
११. शुभविवाह
१२. मुरांबा
१३. मन धागा धागा जोडते नवा
१४. लग्नाची बेडी
१५. आई कुठे काय करते
हेही वाचा : “अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
‘आई कुठे काय करते’ मालिका २०१९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. यानंतर ही मालिका सातत्याने टॉप १० मध्ये होती. एकेकाळी टीआरपीत अवव्ल स्थानी असलेल्या या मालिकेचा टीआरपी आता घसरला आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेने या शर्यतीत १५ वं स्थान मिळवलं आहे. मालिकेची बदललेली वेळ आणि कथानक याचा फटका मालिकेला बसल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही वर्षांपासून टॉप-१० असणारी ‘आई कुठे काय करते’ मालिका थेट १५ व्या स्थानावर पोहोचली आहे.