इंडियन आयडॉलची ट्रॉफी जिंकल्यानंतर ‘मोहब्बतें लुटाऊंगा’ या गाण्यातून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण करणारा गायक म्हणजे अभिजीत सावंत हा होय. या गाण्यामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आता एका मुलाखतीत या गाण्यामागची गोष्ट त्याने सांगितली आहे.

काय म्हणाला अभिजीत सावंत?

अभिजीत सावंतने नुकतीच ‘लोकशाही फ्रेंडली मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला मोहब्बतें लुटाऊंगा या गाण्याविषयी काय सांगशील, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने, “या गाण्याबद्दल सांगायचं म्हणजे इंडियन आयडॉलमध्ये जे टॉप ३ होते, त्यांना हे गाणं व त्याची बेसिक ट्युन देण्यात आली होती. तुम्ही तुमच्या पद्धतीनं हे गाणं तयार करा, असं सांगितलं गेलं. कारण- जे टॉप २ येतील, त्यांना त्यांचं व्हर्जन ऐकवलं जाईल. तर अमितनं एका रॉक स्टाईलमध्ये मोहब्बतें लुटाऊंगा बनवलेलं. मी विचार केलेला की, जो कोणी जिंकेल, त्याच्यासाठी तो उत्सव असेल. मग ते गाणं तसं असलं पाहिजे आणि त्यामुळे ते गाणं मी तसं बनवलेलं. जिंकल्यानंतर हे गाणं मी म्हटलं होतं”, अशा प्रकारे या गाण्यामागची कहाणी सांगितली.

यापुढे करिअरमध्ये काय करायचं आहे, असा प्रश्न विचारल्यावर अभिजीत सावंतने, “मी शोमध्ये यायच्या आधीदेखील म्हटलं होतं की, मला मराठी प्रेक्षकांसाठी काम करायचं आहे. मराठी चित्रपट पार्श्वगायक म्हणून काम करायचं आहे. मला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, ज्या यावेळी मी करू शकतो”, असे मनोगत स्पष्ट करीत अभिजीतने अनेकविध क्षेत्रांत काम करायचे आहे, असे सांगितले होते.

हेही वाचा: Prashant Damle : ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ सिनेमात प्रशांत दामले ‘हिटलर’च्या भूमिकेत, परेश मोकाशींचा नवा सिनेमा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिजीत सावंत नुकताच बिग बॉस मराठी ५ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. या शोमध्ये गेल्यानंतर त्याच्या खेळाची मोठी चर्चा झाली. चाहत्यांना त्याचा गेम आवडल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या वागण्यामुळे त्याला जंटलमन, अशी नवीन ओळखदेखील मिळाली. बिग बॉसच्या या पर्वात त्याने टॉप २ पर्यंत मजल मारल्याचे पाहायला मिळाले. सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता आणि अभिजीत उपविजेता ठरला आहे. आता अभिजीत सावंत कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.