गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रभरात पावसाने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. मुंबईत सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने ठिकठिकाणी पाणी साचलं. मुंबईतल्या आया पावसाचा परिणाम वाहतूकव्यवस्थेवर झाला आहे. अनेक ठिकाणी गाड्या अडकून पडल्या आहेत. लोकल ट्रेन्ससुद्धा उशिराने धावत आहेत.

पाण्याने भरलेले रस्ते, वाहतुकीची प्रचंड कोंडी आणि रोजचं आयुष्य जगण्यासाठी धडपडणारे लोक – हे दृश्य आता प्रत्येक पावसाळ्यातलं आहे. पावसाळा अडचणी घेऊन येतो खरं, पण या शहराचा उत्साह आणि जिद्द मात्र कधीच कमी होत नाही. अनेक मुंबईकर या संकटाच्या काळात एकमेकांना साथ देताना आणि मदत करताना पाहायला मिळत आहेत.

याच मदत करणाऱ्या मुंबईकरांबद्दल लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे, अभिनेता गुरमीत चौधरीने मुंबईच्या जिद्दीला सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून पोस्टमधून शब्दबद्ध केलं आहे.

शूटिंगसाठी जात असताना कारमधून बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसाचा आणि या पावसात मदतीचा हात देणाऱ्या काही मुंबईकरांचा व्हिडीओ त्याने आपल्या सोशल मीडियार शेअर केला आहे. गुरमीतने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती लोकांना मदत करताना दिसतो. या व्यक्तीला गुरमीतने धन्यवाद म्हटलंय.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये गुरमीत म्हणतो, “फक्त मुंबईतच हे शक्य आहे. तूफान पावसात अडकलेली वाहनं, आजूबाजूला पूरसदृश परिस्थिती… पण तरीही लोक एकमेकांना मदत करतायत. म्हणूनच तर आम्हाला हे शहर खूप आवडतं. सगळ्यांनी सुरक्षित राहा!” त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनीसुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

गुरमीत चौधरी इन्स्टाग्राम व्हिडीओ

तर या व्हिडीओमध्ये अभिनेता असं म्हणतो, “आम्ही शुटींगला जात आहोत आणि खूप म्हणजे खूपच पाऊस पडत आहे. खूप वेळापासून हे पाणी इथे साचलं आहे. या पाण्यात मदत करण्यासाठी सुद्धा खूप लोक पुढे आले आहेत.” दरम्यान, गुरमीतने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पावसाची भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. या पाण्यातून अभिनेत्याच्या चालकालासुद्धा वाट काढणं कठीण जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, गुरमीत चौधरी आणि देबिना बनर्जी या लोकप्रिय जोडीने नुकतंच ‘पति पत्नी और पंगा’ या रिअ‍ॅलिटी शोमधून टेलीव्हिजनवर पुनरागमन केलं आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोनाली बेंद्रे आणि मुनव्वर फारुकी करत आहेत. २ ऑगस्टपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.