टीव्ही अभिनेता करण शर्मा दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. ४३ वर्षीय करणने लोकप्रिय अभिनेत्री पूजा सिंह हिच्याशी लग्न केलं. पूजाने ‘दिया और बाती हम’ मालिकेत संध्याच्या जाऊची भूमिका केली होती. तर, करण हा ‘ससुराल सिमर का’, ‘एक नई पेहचान’, ‘काला टीका’, ‘ससुराल सिमर का २’ या मालिकांसाठी ओळखला जातो.

पूजा व करण यांनी ३० मार्च रोजी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. नीलू वाघेला या जोडप्याच्या लग्नाला उपस्थित होत्या. करण व पूजा यांच्या लग्नातील विधींचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांच्या संगीत व ब्रायडल एंट्रीचे व्हिडीओदेखील समोर आले असून दोघेही या व्हिडीओत सुंदर दिसत आहेत. चाहते या जोडप्याचं अभिनंदन करत आहेत.

पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

पूजाने एका मुलाखतीत करणबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. “खरं तर हे एखाद्या स्वप्नासारखं आहे, कारण आम्ही अनेक वर्षांपासून एकाच इंडस्ट्रीत काम करत आहोत. पण कधीच भेटलो नाही. २०२३ मध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आमची भेट झाली. मी त्याची वाट पाहत होते, तो त्याच्या बहिणीसह तिथे आला आणि आम्ही बोललो आणि आम्हाला एकमेकांबरोबर बोलून चांगलं वाटलं,” असं पूजाने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूजा व करण दोघेही घटस्फोटित होते. करणचं पहिलं लग्न टिया कर हिच्याशी २०१६ मध्ये झालं आणि तीन वर्षांनी २०१९ मध्ये ते विभक्त झाले. तर, पूजाने २०१७ मध्ये कपिल छट्टानीशी लग्न केलं होतं. पण त्यांचं लग्नही फारकाळ टिकू शकलं नाही. दोन वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आता दोघांनी लग्न केलं आहे.