‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत परीची भूमिका साकारणारी लाडकी मायरा आज घराघरांत लोकप्रिय झाली आहे. मायरा वैकुळने मराठीसह हिंदी मालिकेत सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मायराची आई तिचे गोड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. गणेशोत्सवानिमित्त मायराच्या घरी पाच दिवसांच्या बाप्पाचं आगमन झालं होतं. बाप्पाला निरोप देताना ही बालकलाकार भावुक झाल्याचा गोड व्हिडीओ अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशातच आता इन्स्टाग्रामवर मायराचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मायरा तिच्या लाडक्या बाप्पाला गाऱ्हाणं घालत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video : वर्षा उसगावकरांचं गोव्यातील सुंदर घर पाहिलंत का? व्हिडीओ पाहून नेटकरीही भारावले, म्हणाले…

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देताना गाऱ्हाणं घालण्याची परंपरा असते. यानुसार बालकलाकार मायरा वैकुळच्या घरी तिने स्वत: बाप्पाला गाऱ्हाणं घालून निरोप दिला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : कंगना रणौतने राजकारणात येण्याविषयी मांडलं मत; म्हणाली, “मी एक देशभक्त…”

“गणपती बाप्पा मोरया! आमच्याकडून काही चुकलं असेल, तर तू आम्हाला माफ कर…आज तुझ्या जाण्याचा दिवस आहे पण, आम्हाला वाटतं तू नको जाऊस. तू गेल्यावर सगळं घर सुनं सुनं वाटतं. म्हणून तू आमच्याकडे नेहमीच राहा अशी आमची इच्छा असते. तुला निरोप द्यायची वेळ आलीये…आता तू हॅपी हॅपी जा आणि पुढच्या वर्षी आमच्याकडे खूप दिवस राहा.” अशी मागणी छोट्या मायराने बाप्पाकडे गाऱ्हाणं घालत केली आहे.

हेही वाचा : Bigg Boss 17: अंकिता लोखंडे पतीसह यंदाच्या बिग बॉसमध्ये प्रवेश करण्यास सज्ज; खरेदी केले २०० कपडे अन् ‘हा’ प्लॅन…

View this post on Instagram

A post shared by Myra Vaikul (@_world_of_myra_official)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मायराच्या या व्हिडीओवर सध्या नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. “खूप सुंदर मायरा”, “मायरा तू खूप हुशार आहेस…लव्ह यू बेटा” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. दरम्यान, मायराने ‘माझी तुझी रेशीमगाठ’नंतर प्रसिद्ध हिंदी मालिका ‘नीरजा एक नई पेहचान’मध्ये लहानपणीच्या नीरजाची प्रमुख भूमिका साकारली होती. यामध्ये तिने ‘बिग बॉस’ फेम स्नेहा वाघच्या लहान मुलीची भूमिका साकारली होती.