मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. संकर्षण हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. त्याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. सध्या संकर्षण हा माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत यशच्या मित्राची भूमिका साकारत आहे. इतकंच नव्हे तर सध्या संकर्षण हा तू म्हणशील तसं या नाटकात काम करत आहे. नुकतंच त्याने यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

संकर्षण कऱ्हाडे हा त्याच्या कामाबद्दल नेहमी अपडेट देत असतो. काही दिवसांपूर्वी तो लंडनमध्ये कामानिमित्त गेला होता. यानंतर तो पुन्हा एकदा त्याच्या दैनंदिन कामात गुंतला आहे. नुकतंच त्याने त्याच्या नाटकानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने काही फोटोही पोस्ट केले आहेत. यात त्याने गावाकडची माणसं भेटल्यानंतर काय आनंद होतो याबद्दल मत व्यक्त केले आहे.
आणखी वाचा : “हळदी कुंकूचा हट्ट नाही पण…” हेमांगी कवी स्पष्टच बोलली

संकर्षण कऱ्हाडेची इन्स्टाग्राम पोस्ट

“आत्ता ठाण्यात रात्रीच्या गडकरीच्या प्रयोगानंतर एक जोडपं भेटलं.. मला म्हणाले ; “दादा , आम्ही पण परभणीचे आहोत.. यंदा दिवाळी ला जाणार.. दसरा इथच..”
ह्या वेळी कामामुळे मला घरी , आई बाबांकडे जाता येत नाहीये ह्याचं थोडं वाईट वाटत होतंच.. आणि त्यात ह्यांची भेट झाली.
आहो काय सांगु .. आपल्या गावाकडं जाणारी एस. टि. दिसली तरी बरं वाटतं .. ही तर “गावाकडची माणसं..” लई बरं वाटलं बघा..!
तुमचं गाव कुठलं ..? सांगा बरं .. ! यंदा तुमचा दसरा कुठं ..? सांगा बरं ..!!”, असे संकर्षण कऱ्हाडेने म्हटलं आहे.

आणखी वाचा : “मी हा चित्रपट…” ‘महाभारता’त कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची ‘आदिपुरुष’च्या टीझरवर प्रतिक्रिया

दरम्यान संकर्षण कऱ्हाडे हा सध्या त्याच्या मालिका आणि नाटक यामध्ये व्यस्त आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत त्याने यशचा मित्र समीर ही भूमिका साकरली आहे. या मालिकेचं शूटिंग, नाटकाचे प्रयोग, परदेशातील नाटकाचे दौरे यातून वेळ मिळाल्यानंतर त्याने अलिकडेच एक कविता इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. ही कविता प्रचंड व्हायरल झाली होती.