अभिनेत्री तुनिषा शर्मा हिची आत्महत्या ही सर्वांसाठीच धक्कादायक बातमी होती. आत्महत्येनंतर अनेक निर्माते आपल्या कलाकारांची अधिक काळजी घेऊ लागले आहेत. आता अशातच आणखीन एक गंभीर घटना घडली आहे. ‘बडे अच्छे लगते हैं २’ या मालिकेच्या सेटवर एक मोठा अपघात झाला असून अभिनेत्री अलेफिया कपाडिया हिला गंभीर दुखापत झाली आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, ते मालिकेतील एका डान्सचे शूटिंग करत होते. अभिनव तिच्या समोर उभा होता आणि इतर कलाकार नृत्याचा सराव करण्यात व्यग्र होते. इतक्यात तिच्या पायावर लाईट पडला. वेदनेने कळवळून ती खाली बसली. लगेच टि तिच्या मेकअप रूममध्ये गेली. बराच वेळ ती रूममधून बाहेर न आल्यामुळे तिच्या सहकलाकारांना या अपघाताबद्दल कळलं.

आणखी वाचा : “मारामारीचे सीन शूट करताना त्याने…” ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील ‘वर्षा’ची पोस्ट चर्चेत

अलेफिया म्हणाली, “माझ्या पायाच्या बोटाला सूज आली असून त्याचं नख काळं निळं झाला आहे. यामुळे माझ्या पायाला असह्य वेदना होत आहेत आणि मला चाळणंही कठीणही झालं आहे. सध्या मी आराम करत असून डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचना मी पाळत आहे.”

हेही वाचा : “अभिनेत्री होण्यासाठीचे गुण माझ्यात नाहीत…” स्पृहा जोशीच्या पोस्टने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलेफिया सध्या शूटिंगमधून ब्रेक घेऊन आराम करत आहे. तिच्या पायाला झालेली जखम बरी झाली की ती शूटिंगला पुन्हा सुरुवात करेल. या मालिकेत पुढील काही भागांमध्ये तिची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.