Actress Hina Khan Health Update : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खानला स्तनांचा कर्करोग झाला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. हिनाला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोग झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रकृतीबाबत विविध बातम्या येत होत्या, त्यामुळे अभिनेत्रीने स्वतः पोस्ट करून चाहत्यांना माहिती दिली आहे.

हिना खानने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. “सर्वांना नमस्कार! काही अफवा आहेत, ज्यावर मला बोलायचं आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझी काळजी करणाऱ्या सर्व लोकांबरोबर मला काहीतरी महत्त्वाचं शेअर करायचं आहे. मला तिसऱ्या टप्प्यातील स्तनांचा कर्करोग असल्याचं निदान झालं आहे,” असं हिनाने लिहिलं.

एकेकाळी अफेअरच्या चर्चा, आता मनीषा कोईरालाबद्दल विचारताच नाना पाटेकर म्हणाले, “तिचा फोन नंबर…”

हिनाने पुढे लिहिलं, “मी या आजारावर मात करण्यासाठी तयार आहे. माझे उपचार आधीच सुरू झाले आहेत आणि यातून आणखी मजबूत होऊन बरी होण्यासाठी मी सर्व शक्य प्रयत्न करण्यास तयार आहे. या कठीण काळात माझ्या प्रायव्हसीचा आदर करा. तुम्ही कठीण प्रवासात तुमचा पाठिंबा, सल्ले आणि अनुभव तुम्ही शेअर करू शकता.”

२५० कोटींचे कर्ज फेडण्यासाठी विकलं ऑफिस? आमदार धिरज देशमुखांचे सासरे म्हणाले, “मी गेल्या ३० वर्षांपासून…”

हिनाचे कुटुंबीय या कठीण काळात तिच्यासोबत आहेत. तिने चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे. या आजारातून बरी होईन अशी असा मला विश्वास आहे, असंही हिनाने सांगितलं.

हिना खानने तिच्या प्रकृतीबद्दल माहिती दिल्यानंतर तिचे चाहते काळजी व्यक्त करत आहेत. सोशल मीडिया पोस्टवर तिचे इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणी कमेंट्स करून तिला काळजी घेण्यास सांगत आहेत. हिनाच्या पोस्टवर शार्दुल पंडित, रोहन मेहरा, पायल गौर, सयंतनी घोष, लता सभरवाल, हेली शाह, रश्मी देसाई, आश्का गोराडिया, उदय टिकेकर यांनी कमेंट्स केल्या आहेत.

विदेशात पाहिली जातेय मराठी मालिका; स्वप्नील जोशीच्या ‘तू तेव्हा तशी’चा व्हिडीओ पाहून प्रेक्षक म्हणाले, “उखाणे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एप्रिलमध्ये हिनाने सोशल मीडियावर तिला गंभीर आरोग्य समस्या असल्याचं सांगितलं होतं. मात्र तेव्हा तिने कर्करोगाबद्दल काहीच माहिती दिली नव्हती. मध्यंतरी काही दिवस ती रुग्णालयात दाखल होती. तिने रुग्णायतील तिचे फोटोही शेअर केले होते. तिने जेवताना त्रास होत असल्याची माहिती तेव्हा दिली होती.