अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या कामाचं प्रेक्षक कौतुक करत असतातच, याचबरोबर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती चांगलीच चर्चेत असते. गेल्याच वर्षी तिने प्रतीक शाहशी लग्नगाठ बांधली. तर आता तिने तिच्या सासूबाईंबरोबर तिचं नातं कसं आहे, हे उलगडलं आहे.

ऋताने १८ मे २०२२ रोजी प्रतीक शाहशी लग्नगाठ बांधली. प्रतीक दिग्दर्शक आहे. करिअरच्या शिखरावर असताना ऋताने लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत ती अनेकदा प्रतीकबद्दल भरभरून बोलली आहे. प्रतीक आणि तिच्यात नातं आहे, हे तिने आतापर्यंत अनेकदा सांगितलं आहे. तर आता तिने तिच्या सासूबाईंबरोबरच्या नात्याबद्दल मोठा खुलासा करत ती त्यांच्याशी कसं वागते आणि करिअरमध्ये सासूबाई तिला कसा पाठिंबा देतात, हे तिने सांगितलं आहे.

आणखी वाचा : “… म्हणून ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटक सोडलं,” ऋता दुर्गुळेने स्पष्ट केलं कारण

ऋता नुकतीच सुलेखा तळवलकरच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी बोलताना ती म्हणाली, “इथे मी आहे म्हणून तुला सगळं हातात आणून देतेय, लग्न झाल्यावर तुझं कसं होईल! असं माझी आई मला नेहमी म्हणायची. पण माझं नशीब चांगलं आहे की मला सासूही आईसारखीच मिळाली. लग्नानंतर माझा फक्त पत्ता बदललाय बाकी काहीही बदललेलं नाही. लग्नापूर्वी मी आईवर जितका हक्क दाखवला तेवढाच हक्क आता सासूवरही दाखवते. उद्या मी ७ वाजता निघणार आहे आणि मला हा हा नाश्ता हवाय, असं मी आधी आईला सांगायचे. तसंच मी इथे माझ्या सासूबाईंना पण सांगते. आमच्यातलं नातं आणखीनच घट्ट झालंय.”

हेही वाचा : “अभिनय क्षेत्रात काम मिळविण्यासाठी…,” ऋता दुर्गुळेने सांगितली मनोरंजन सृष्टीतील सत्य परिस्थिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “माझ्या लग्नानंतर मी माझ्याबद्दल आणि कामाबद्दल जास्त कॉन्फिडन्ट झाले. माझा आत्मविश्वास आणखीन वाढला. हे झालं ते फक्त प्रतीक आणि आईंमुळे. त्या खूप मोठी सपोर्ट सिस्टीम आहेत. तू आधी करिअरचं बघ, बाकी सगळं नंतर, असं त्या मला सांगतात. कुठे मिळते अशी सासू! त्या खूप चांगल्या आहेत.” आता ऋताचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे.