छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘दिया और बाती हम’ फेम अभिनेत्री कनिष्का सोनीने काही महिन्यांपूर्वी एक मोठा खुलासा केला. कनिष्काने लग्न केल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली. पण तिने स्वतःशीच लग्न केलं असल्याचं सांगितलं. ही बातमी ऐकताच तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. लग्न करण्यासाठी मला पुरुषाची गरज नाही असंही कनिष्काने म्हटलं होतं. आता तिच्याबाबत एक नवी माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – कर्करोगामुळे केस गेले म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्रीला शोमधूनच काढलं बाहेर, म्हणाली, “केमोथेरपी झाल्यानंतर…”

सध्या कनिष्का भारतात नव्हे तर न्युयॉर्कमध्ये राहते. सोशल मीडियावर ती फार सक्रिय असते. नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये तिने तिच्या प्रग्नेंसीबाबत भाष्य केलं. तसेच या पोस्टबरोबर तिने तिचे काही फोटोही शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचं पोट वाढलेलं दिसत आहे.

काय म्हणाली कनिष्का सोनी?
“मी स्वतःशीच लग्न केलं म्हणून मी स्वतःच गरोदर आहे असं नाही. हे फक्त पिझ्झा व बर्गरचा परिणाम आहे. हे सगळे पदार्थ खाऊन माझं वजन वाढलं आहे. पण हे पदार्थ माझ्या आवडीचे आहेत.” वाढलेलं पोट पाहून गरोदर असल्याच्या अफवा पसरू नये म्हणून कनिष्काने ही पोस्ट शेअर केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – Inside Photos : कधीकाळी चाळीत राहणाऱ्या अभिनेत्री पूजा सावंतचं नवं आलिशान घर पाहिलंत का? स्वयंपाकघरही आहे फारच सुंदर

कनिष्काने ‘पवित्र रिश्ता’, ‘देवी आदि पराशक्ती’ यांसारख्या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. काही काळ छोट्या पडद्यावर लहान मोठ्या भूमिका साकारणाऱ्या कनिष्काने हॉलिवूडमध्ये चांगले प्रोजेक्ट्स मिळावेत म्हणून टीव्ही इंडस्ट्री सोडली होती.