scorecardresearch

“माझी मुलं मला बघून रडतात” सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला करोनाची लागण, अशी झाली आहे अवस्था, म्हणाली, “श्वास घेणंही…”

करोनाची लागण झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची झाली आहे अशी अवस्था, शेअर केला व्हिडीओ

Mahhi Vij Covid Mahhi Vij
करोनाची लागण झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची झाली आहे अशी अवस्था, शेअर केला व्हिडीओ

करोना विषाणू पुन्हा डोकं वर काढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच कलाक्षेत्रातील काही मंडळींना सध्या या विषाणूनचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच किरण खेर, पूजा भट्टला करोनाची लागण झाली असल्याचं वृत्त समोर आलं. आता आणखी एक सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला करोनाची लागण झाली आहे. माही वीजला या आजाराचा सामना करावा लागत आहे. तिने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली.

माही बराच काळापासून अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. पण सोशल मीडियाद्वारे ती कायमच चाहत्यांच्या संपर्कात असते. आताही करोनाची लागण झाल्यानंतर ही बातमी तिने शेअर केली. आपल्या मुलांनाही भेटता येत नसल्याचं दुःख तिने बोलून दाखवलं. माही म्हणाली, “चार दिवसांपूर्वीच करोनाची लागण झाली असल्याचं मला कळालं. ताप आणि इतर लक्षणं मला जाणवू लागल्यानंतर मी टेस्ट केली”.

आणखी वाचा – प्रेमविवाह, वाद, आर्थिक चणचण अन्…; ४० वर्षांनंतर आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत स्मृती इराणींचं भाष्य, म्हणाल्या, “त्यांच्यामध्ये…”

अभिनेत्रीची अशी आहे अवस्था

“करोना चाचणी करू नको असं मला सगळ्यांनी सांगितलं. पण घरात लहान मुलं आहेत तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मी ही चाचणी करुन घेतली. काही दिवस मला श्वास घेण्यासही त्रास होत होता. याआधीही मला करोनाची लागण झाली होती. पण तेव्हा इतका त्रास झाला नाही. मी माझ्या मुलांपासून लांब आहे. जेव्हा ताराला मी व्हिडीओ कॉलवर पाहते तेव्हा ती, “आई आम्हाला तू आमच्या जवळ हवी आहेस” असं सातत्याने म्हणते”.

आणखी वाचा – २२व्या वर्षी लग्न, पाच मुलं आणि…; लग्नानंतरही राज कपूर यांचं सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर होतं अफेअर, पत्नीला समजलं अन्…

पुढे माही म्हणाली, “जेव्हा तुमची मुलं तुमच्या आठवणीमध्ये रडतात तेव्हा तुम्हाला अधिक दुःख होतं. मी एवढंच सांगेन की, तुम्ही तुमची काळजी घ्या”. मुलांना रडताना पाहून माहीला अधिक दुःख होत आहे. करोनाचा सामना करत असताना तिने सगळ्यांनाच अधिक खबरदारी घेण्यास सांगितली आहे. तसेच माहीच्या उत्तम आरोग्यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 14:23 IST

संबंधित बातम्या