‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून अभिनेत्री नम्रता संभेराव हिला एक वेगळी ओळख मिळाली. आज तिच्या विनोदी शैलीचे लाखो चाहते आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामध्ये नम्रता साकारत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खळखळून हसवतं. तर सध्या त्या कार्यक्रमाच्या चित्रीकरणातून थोडा ब्रेक घेऊन तिच्या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त अमेरिकेला गेली आहे. या दरम्यान तिने अभिनेत्री विशाखा सुभेदारसाठी एक पोस्ट केली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नम्रताचा चाहतावर्ग खूप वाढला आहे. याच कार्यक्रमात विशाखा सुभेदारही होती. काही दिवसांपूर्वी तिने या कार्यक्रमातून एग्झिट घेतली. या दोघीही सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. अमेरिका दौऱ्याला गेल्यानंतर नम्रता विविध फोटो व्हिडीओ पोस्ट करत त्यांची ट्रीप कशी सुरू आहे हे चाहत्यांना दाखवत आहे. आता एक पोस्ट शेअर करत तिने विशाखा सुभेदारचे आभार मानले आहेत.

आणखी वाचा : “नवीन मालिका खूपच वाईट आणि…” नेटकऱ्याच्या स्पष्ट प्रतिक्रियेवर विशाखा सुभेदारने दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाली…

नम्रताने त्या दोघींचा एक फोटो शेअर करत लिहिलं, “आपली स्वप्नं पूर्ण होत असल्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. फक्त स्वप्नं रंगवलं होतं अमेरिकेत जाण्याचं, पण इथे येऊन मनोरंजन करायला मिळतंय आणि मुबलक फिरायला देखील मिळतंय. ताई तुला खूप खूप धन्यवाद माझं अनेक स्वप्नांपैकी हे एक स्वप्न पूर्ण केल्याबद्दल.”

हेही वाचा : नम्रता संभेरावच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, नेटकरी म्हणाले, “हा तर विराट कोहली!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिने ही पोस्ट शेअर करताच तिच्या चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. तिचे चाहते या पोस्टवर कमेंट्स करत त्यांच्यातल्या बॉण्डिंगचं कौतुक करत आहेत.