अभिनेत्री प्राजक्ता माळी संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. अभिनयाबरोबरच प्राजक्ता उत्तम नृत्यांगणा आणि सूत्रसंचालिकाही आहे. प्राजक्ताने काही दिवसांपूर्वीच ‘प्राजक्तराज’ म्हणून तिचा नवा ज्वेलरी ब्रँड सुरू केला. आता ती एक व्यावसायिकाही आहे. प्राजक्ता तिच्या कामामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. तसेच तिच्या खासगी आयुष्याबाबतही अनेक चर्चा रंगताना दिसतात.

आणखी वाचा – मंडप सजला, नवरी नटली अन्…; वनिता खरातचा नववधू लूक समोर, मराठी कलाकारांची लग्नासाठी हजेरी

प्राजक्ता कशी राहते?, तिचं लाइफस्टाइल कसं आहे? याबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्यास तिच्या चाहत्यांना आवडतात. आता प्राजक्ताने अशाच एका गोष्टीचा खुलासा केला आहे. खऱ्या आयुष्यातही प्राजक्ता पडद्यावर दिसते तितकीच शांत आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांनाही आहे. याबाबततच तिने आता स्पष्ट सांगितलं आहे.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्राजक्ताला एक प्रश्न विचारण्यात आला. शेवटची शिवी तू कधी दिली? असं तिला विचारण्यात आलं. यावर प्राजक्ता म्हणाली, “मी शेवटची शिवी ‘रानबाजार’ वेबसीरिजच्या चित्रीकरणादरम्यान दिली. तेव्हा मी खूप शिव्या दिल्या.”

आणखी वाचा – शॉपिंगसाठी एकावेळी हजारो रुपये खर्च करते प्राजक्ता माळी, स्वतःच केला खुलासा, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राजक्ताची या वेबसीरिजमध्ये अगदी बोल्ड भूमिका होती. दरम्यान या भूमिकेची गरज म्हणून तिला अपशब्द वापरावे लागले. पण हिच तिची शेवटची शिवी होती असं तिचं म्हणणं आहे. प्राजक्ता तिच्या प्रत्येक भूमिकेला न्याय देण्यासाठी अगदी पुरेपुर प्रयत्न करते. ‘रानबाजार’मधील तिची भूमिकाही प्रचंड गाजली.