Marathi Actress Childhood Photo : आपल्या आवडत्या कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असतो. बहुतांश सेलिब्रिटी वाढदिवसानिमित्त किंवा सणासुदीला जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी बालपणीचे फोटो शेअर करतात. मराठी कलाविश्वातील सगळ्याच कलाकारांनी यंदा मोठ्या उत्साहाने रक्षाबंधन सण साजरा केला.
रक्षाबंधन पार पडल्यावर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत. यात एका लोकप्रिय अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीने रक्षाबंधननिमित्त तिच्या भावाबरोबर जुना फोटो रिक्रिएट केला आहे. बालपणीचा फोटो आणि आताचा फोटो असे दोन फोटो या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या बालपणीच्या फोटोमध्ये ती तिच्या भावाबरोबर सत्यनारायण पूजेच्या पाया पडताना दिसत आहे. निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस घालून आणि देवासमोर हात जोडून या चिमुकलीने फोटोसाठी पोज दिल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. या चिमुकलीच्या चेहऱ्यावरील निरागस भाव आणि क्युट स्माइल लक्षवेधी ठरते. आता प्रत्येकाला ही अभिनेत्री नेमकी कोण आहे असा प्रश्न पडला आहे. पुढच्या स्लाइडमध्ये याच अभिनेत्रीने बालपणीच्या फोटोसारखा रिक्रिएट केलेला नवीन फोटो देखील शेअर केला आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती व बिझनेसवुमन…
आता अनेकांना प्रश्न पडला असेल ही चिमुकली आहे तरी कोण? तर, फोटोत दिसणारी हे गोंडस मुलगी आज मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आहे. प्राजक्ताने गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘फुलवंती’ सिनेमाच्या निमित्ताने कलाविश्वात निर्माती म्हणून पदार्पण केलं. ती उत्तम नृत्यांगणा सुद्धा आहे. याशिवाय प्राजक्ता बिझनेसवुमन म्हणून देखील ओळख जाते. ‘प्राजक्तराज’ हा तिचा ज्वेलरी ब्रँड सर्वत्र प्रसिद्ध आहे. तिला ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने घराघरांत ओळख मिळाली. यामध्ये तिने ‘मेघना’ ही भूमिका साकारली होती.
दरम्यान, प्राजक्ताने बालपणीचा फोटो शेअर करत या फोटोला, “Then & Now रिक्रिएटिंग…सत्यनारायण पूजेच्या आठवणी, आमची परंपरा” असं कॅप्शन दिलं आहे. नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.