टीव्ही इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी दोन लग्नं केली. पहिल्या लग्नात अपयश आल्यानंतर या अभिनेत्रींनी प्रेमाला दुसरी संधी दिली आणि आता सुखाचा संसार करत आहेत. अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, जी लग्न करण्यासाठी १५ व्या वर्षी घरातून पळून गेल होती, पण तिचा घटस्फोट झाला.

टीव्हीवरील अनेक अभिनेत्रींना संघर्ष करून अभिनयक्षेत्रात यश मिळवलं. छोट्या पडद्यावर ‘पार्वती’ची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री पूजा बॅनर्जी हिचं फिल्मी आयुष्य यशस्वी राहिलं असं तरी वैयक्तिक आयुष्य मात्र चढ-उतारांनी भरलेलं राहिलं. पूजा घरातून पळून गेली होती आणि तिने कमी वयातच बॉयफ्रेंडशी लग्नही केलं होतं, पण तिचा संसार टिकला नाही.

९ वर्षांनी झाला घटस्फोट

पूजा बॅनर्जी १५ व्या वर्षी घरातून पळून गेली होती. एवढंच नाही तर लग्नाआधीच ती गरोदर झाली होती. पूजा बॅनर्जीने २००४ मध्ये तिचा बॉयफ्रेंड अरुणॉय चक्रवर्तीशी लग्न केलं होतं. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघांनी २०१३ मध्ये घटस्फोट घेतला.

आपले पहिले लग्न मोडल्याचे दु:ख विसरून पूजा बॅनर्जीने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आणि ‘देवों के देव महादेव’मध्ये देवी पार्वतीची भूमिका साकारली. या भूमिकेने पूजा बॅनर्जीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर २०२२ मध्ये पूजा स्टारप्लसवरील मालिका ‘अनुपमा’ची प्रीक्वल वेब सीरिज ‘अनुपमा: नमस्ते अमेरिका’ मध्ये रितिकाच्या भूमिकेतून अभिनयात परतली.

पूजा बॅनर्जीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास टीव्हीवर काम करून लोकप्रियता मिळवल्यानंतर तिची टीव्ही अभिनेता कुणाल वर्माशी भेट झाली. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २०२१ मध्ये गोव्यात लग्नगाठ बांधली. मात्र, पूजा बॅनर्जी त्याआधीच २०२० मध्ये आई झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही बंगाली रितीरिवाजांनुसार लग्न केलं. आमचं लग्न झालं असलं आणि बाळ झालं असलं तरी, पुन्हा लग्न केल्याने एक नवीन अनुभव मिळतोय. यामुळे आमच्या नात्यात नाविण्य आलं आहे. आमच्या नात्यात काहीतरी नवीन आहे. आम्हाला आमचे नातेवाईक नवविवाहित जोडप्यासारखे वागवत आहेत,” असं लग्नाबद्दल बोलताना पूजा बॅनर्जी म्हणाली होती.