हिंदी मनोरंजनसृष्टीत ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तर अनेक जण राखीची कॉपीही करताना दिसतात. आता राखीची कॉपी करणाऱ्यांबद्दल तिने स्पष्ट भाष्य केलं आहे.
राखीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांना शायरी ऐकवत आहे. आतापर्यंत तिच्या अनेक चाहत्यांनी तिचा आवाज वापरून तिच्यासारखा व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आता या सगळ्याबद्दल राखीने मौन सोडलं आहे.
राखीचा एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे. यामध्ये ती मीडिया फोटोग्राफरशी गप्पा मारताना दिसत आहे. या वेळी एकाने तिला विचारलं की, “आजकाल अनेक जण तुमची कॉपी करतात आणि व्हिडीओ बनवतात. त्यांनाही राखी सावंत बनायचं आहे. ते पाहून तुम्हाला काय वाटतं?” त्यावर राखी म्हणाली, “राखी सावंत तर एकच आहे. राखी सावंत ओरिजनल आहे, बाकी लोक तिची कॉपी करू शकतात. त्यांना ते करू दे. त्यांचं घर चालेल. पण पुढच्या सात जन्मांमध्ये कोणीही राखी सावंत बनू शकत नाही.”
आता तिच्या या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत राखीच्या या वक्तव्यावर त्यांचं मत मांडत आहेत. यावर अनेकांनी कमेंट करत “हो राखी, तुझं म्हणणं खरं आहे. तुझ्यासारखं दुसरं कोणीच होऊ शकत नाही,” असं म्हणत तिला ट्रोल केलं आहे.