Star Pravah Marathi Serial Aboli : ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसले सध्या तिच्या नव्या ‘लपंडाव’ या मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. प्रेक्षकांची आवडती खलनायिका ‘संजना’ आता ‘सरकार’ होऊन सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. रुपालीचा ग्लॅमरस लूक, डॅशिंग अंदाज सगळ्याच गोष्टी चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

सर्वत्र रुपालीची चर्चा सुरू असतानाच वाहिनीने प्रेक्षकांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. स्टार प्रवाहवर आता रुपाली पाठोपाठ आणखी एक अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही अभिनेत्री तिने भूमिका साकारलेल्या जुन्याच मालिकेत रिएन्ट्री घेणार आहे. तिच्या रिएन्ट्रीचा प्रोमो वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘ती’ अभिनेत्री नेमकी कोण आहे जाणून घेऊयात…

स्टार प्रवाहवर गेली अनेक वर्षे अबोली ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेत वकील विजया राजाध्यक्ष ही भूमिका अभिनेत्री रेशम टिपणीसने साकारली होती. विजयाला शिक्षणाचा खूप गर्व असतो, कोणतीही केस लढवताना फक्त पैसा मिळवणं हा एकच हेतू तिच्या मनात असतो असं हे एकंदर रेशमने साकारलेलं विजया हे पात्र होतं. मध्यंतरी कथानकानुसार रेशमने काही महिने या मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र, आता पुन्हा एकदा ती विजया होऊन रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.

“अंकुश-अबोलीच्या आयुष्यात ‘ती’ परत येतेय…कोण आहे ओळखा पाहू…” असं कॅप्शन देत स्टार प्रवाहने रेशमच्या एन्ट्रीचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये तिचा चेहरा लपवण्यात आला आहे. मात्र, नेटकऱ्यांनी डोळ्यांवरूनच तिला अचूक ओळखलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विजया राजाध्यक्ष हे पात्र मालिकेत परत येणार हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये आनंद व्यक्त केला आहे. ‘अबोली’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रात्री ११ वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये गौरी कुलकर्णी आणि सचित पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत.