अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ही टेलिव्हिजन आणि चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. संवेदनशील भूमिका असो अथवा नकारात्मक; तिने तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. लॉकडाऊनमध्ये शर्मिष्ठाने तेजसबरोबर लग्नगाठ बांधली. नुकत्याच एका मुलाखतीत शर्मिष्ठाने आपल्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा- ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्री नंदिता पाटकरनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “एक सिक्रेट…”

शर्मिष्ठा म्हणाली, मी कोविड काळात मी लग्न केलं. माझ्या लग्नात केवळ ५० लोकच उपस्थित होते. शर्मिष्ठाची जवळची मैत्रीण मेघा धाडेलाही या लग्नाचं आमंत्रण नव्हतं. मी लग्नाच्या अदल्या दिवसापर्यंत शूट करत होते. हळद लागल्यानंतरही मी जाऊन शुटिंग करत होते. कारण दोन दिवसांचा टेलिकास्ट बाकी होता. लग्नाच्या दिवशी सुद्धा मी सकाळी शूट केलं आणि दुपारनंतर मुहुर्ताला पोहोचले होते.

अभिनेत्री मेघा धाडे आणि शर्मिष्ठा राऊत मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. बिग बॉस मराठीमुळे त्या घराघरात पोहोचल्या. बिग बॉस मराठीच पहिलं पर्व चांगलंच गाजलं होतं. ‘बिग बॉस’च्या घरात मेघा धाडे, सई लोकूर आणि शर्मिष्ठा राऊत यांची मैत्री झाली होती.

हेही वाचा- अभिनेत्री ईशा केसकर दिसणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत? ‘या’ कारणामुळे चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शर्मिष्ठा गेल्या दिवस दिवसांपर्यंत ‘अबोली’ मालिकेत काम करत होती. मात्र काही दिवसांपूर्वी तिने या मालिकेतून एग्झिट घेतली. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता लवकरच एका नव्या भूमिकेत ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ती अभिनेत्री म्हणून नाही तर निर्माती म्हणून आपल्याला दिसणार आहे. ती आणि तिचा नवरा तेजस यांनी मिळून नवं प्रोडक्शन हाऊस सुरु केलं असून या माध्यमातून ते मालिकांची निर्मिती करणार आहेत.