हिंदी मनोरंजन सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल. तिचे फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. शहनाजच्या स्वभावाचे, तिच्या वागणूकीचे नेहमीच कौतुक होत असते. सध्या ती चर्चेत आली आहे त्यामागचं कारण आहे ते म्हणजे फिल्मफेअर मिडल ईस्ट अवॉर्ड या पुरस्कारांमुळे, या पुरस्कारात ती भावुक झाली होती. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

फिल्मफेअर मिडल ईस्ट आर्चर्स अवॉर्ड्स या पुरस्कारासाठी शहनाज गिल दुबई येथे गेली आहे. यात कार्यक्रमात तिला पुरस्कार मिळाल्यावर ती भावुक झाली आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे ज्यात ती असं म्हणाली, “हा पुरस्कार मी माझे कुटुंब, मित्र यांना बिलकूल समर्पित करत नाही कारण यात माझी मेहनत आहे. एका व्यक्तीला धन्यवाद बोलू इच्छिते, ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आली माझ्यावर त्या व्यक्तीने मेहनत घेतली, त्यामुळे माझ्या आयुष्यात आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सिद्धार्थ शुक्ला हे तुझ्यासाठी,” अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“उपचारासाठी पैसे नव्हते पण…” विनोदी अभिनेता जॉनी लिव्हरने सांगितला तबस्सूम यांच्याबद्दलचा ‘तो’ किस्सा

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आता या जगात नसला तरी तो आजही त्याच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. त्याच्या मृत्यूनंतर शहनाज पूर्णपणे खचली होती. शहनाझ आणि सिद्धार्थ बिग बॉस कार्यक्रमात भेटले त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहनाज गिल लवकरच सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये चर्चा रंगली असून आता शहनाज आणि सलमान खानची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी रंगते हे पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.