scorecardresearch

Video: ट्रेंडसाठी कायपण! ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच बदलले कपडे, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

या व्हिडीओतील तिच्या बोल्डनेसने सर्वांनाच हैराण केलं आहे.

Video: ट्रेंडसाठी कायपण! ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच बदलले कपडे, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

सध्या सोशल मीडियावर विविध ट्रेंड व्हायरल होताना दिसत आहेत. त्यात अनेक सेलिब्रिटीजही भाग घेताना दिसतात. आता अभिनेत्री शिवांगी वर्मा हिने असंच एक चॅलेंज फॉलो केलं ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ती काही ना काही हटके पोस्ट्स करत असते. पण आता तिने चक्क कॅमेऱ्यासमोर कपडे बदलले आहेत. या व्हिडीओतील शिवांगीच्या बोल्डनेसने सर्वांनाच हैराण केलं आहे.

शिवांगी वर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून ती GRWM (गेट रेडी विथ मी) इंस्टाग्राम ट्रेंडमध्ये सहभागी झाली. या व्हिडिओमध्ये ती कॅमेऱ्यासमोर स्वतःचे कपडे बदलले.

आणखी वाचा : “…पण त्याला थोडं कमी लेखलं गेलं,” करण जोहरने रितेश देशमुखसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

यावेळी तिने घातलेले कपडे काढले आणि वेगळे कपडे घातले. शिवांगीने निल्या रंगाचा ऑफ शोल्डर टॉप आणि त्याखाली काळ्या शॉर्ट स्कर्ट घातला. ह व्हिडीओ शेअर करत तिने लिहीलं, “GRWM (गेट रेडी विथ मी)” या व्हिडीओमध्ये शिवांगीचा आउटफिट खूपच स्टायलिश दिसत असून तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ‘भूल भुलैय्या’ चित्रपटाचा तिसरा भाग येणार येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘हा’ अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका

शिवांगीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिच्या हिमतीचं कौतुक केलं तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे. शिवांगीचं इन्स्टा रील व्हिडिओ चांगलंच चर्चेत आली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 11:41 IST

संबंधित बातम्या