Shweta Tiwari Raja Chaudhary Divorce : लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या श्वेताच्या वैयक्तिक आयुष्यात खूप चढ-उतार आले. श्वेताने २ लग्नं केली, पण दोन्ही वेळा तिचा घटस्फोट झाला. तिचं पहिलं लग्न १९९८ मध्ये झालं होतं आणि ८ वर्षांनी तिने घटस्फोट घेतला होता. पण या घटस्फोटासाठी तिला मोठी किंमत मोजावी लागली होती.

‘कसौटी जिंदगी की’ मधील भूमिकेसाठी श्वेता तिवारी आजही ओळखली जाते. श्वेताच्या पहिल्या पतीचं नाव राजा चौधरी आहे. या दोघांनी १९९८ मध्ये लग्न केलं होतं, २००० मध्ये त्यांची मुलगी पलकचा जन्म झाला. पण नंतर मात्र श्वेता व राजाच्या नात्यात मतभेद होऊ लागले. श्वेताने त्याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल करत २००७ मध्ये घटस्फोट मागितला. घटस्फोटाचा काळ श्वेतासाठी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक होता.

राजा चौधरीला दिला ९३ लाखांचा फ्लॅट

घटस्फोटात सेटलमेंट करताना श्वेताने तिचा सुमारे ९३ लाख किंमत असलेला मुंबईतील एक फ्लॅट पहिला पती राजा चौधरीला दिला होता. फ्लॅट तिच्या पहिल्या पतीला देण्याच्या निर्णयाचे चाहत्यांनी कौतुक केले होते. त्या फ्लॅटची संयुक्त मालकी राजा व त्यांची मुलगी पलक यांची होती. त्या दोघांच्याच नावे फ्लॅट असावा अशी श्वेताची इच्छा होती, पण राजाला तो फ्लॅट फक्त त्याच्या नावे करून हवा होता. संपत्तीच्या बदल्यात राजा मुलगी पलकची पूर्ण कस्टडी श्वेताला द्यायला होता. तसेच फ्लॅटच्या बदल्यात घटस्फोट द्यायलाही तयार होता. राजाच्या या मागणीने श्वेताला मोठा धक्का बसला होता.

सेटलमेंटनुसार, राजाला त्याच्या मुलीला हवं तेव्हा भेटता येणार नव्हतं. पण पलकला जेव्हा तिच्या वडिलांना भेटायचं असेल तेव्हा ती भेटू शकत होती. अशा रितीने श्वेता व राजा यांचं नातं संपलं.

दुसरं लग्नही मोडलं

घटस्फोटानंतर श्वेता पुन्हा प्रेमात पडली. तिने २०१३ मध्ये अभिनेता अभिनव कोहलीशी लग्न केलं. २०१६ मध्ये या जोडप्याने मुलगा रेयांशचं स्वागत केलं. पण नंतर या नात्यातही मतभेद झाले. २०१९ मध्ये, श्वेताने अभिनवविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली, त्याच वर्षी दोघे वेगळे झाले. तेव्हापासून, श्वेता तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. तसेच सिंगल मदर म्हणून तिच्या मुलांचे संगोपन करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्वेता तिवारीचं करिअर

दरम्यान, श्वेता ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘परवरिश’, ‘बेगुसराय’, ‘मेरे डॅड की दुल्हन’ आणि ‘मैं हूं अपराजिता’ सारख्या शोमध्ये दमदार भूमिका साकारल्या. ती ‘नच बलिये’, ‘झलक दिखला जा’ आणि ‘खतरों के खिलाडी’ सारख्या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा भाग देखील राहिली आहे. श्वेताने चित्रपट व वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.