Titeeksha Tawade shares old scenes of serial with Aishwarya Narkar: काही मालिका, चित्रपट, वेब सीरिज, नाटक यांची लोकप्रियता बराच काळ टिकून राहते. एखादी मालिका संपल्यानंतरही त्याची चर्चा होते. अनेकदा त्या त्या मालिकेत काम केलेले कलाकारही त्यांच्या आठवणी शेअर करतात.

सोशल मीडियावर हे कलाकार त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसतात. सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिकादेखील मोठ्या प्रमाणात गाजली होती. २०२२ मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने प्रेक्षकांचे जवळजवळ दोन वर्षे मनोरंजन केले. २०२४ मध्ये ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

या मालिकेतील नेत्रा, रूपाली, फाल्गुनी, अद्वैत, केतकी, अधोक्षज, मैथिली, इंद्रायणी आत्या ही पात्रे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. देवीचे वरदान असलेली नेत्रा आणि रूपाली यांच्यात भांडण, दैवी शक्ती असलेली नेत्रा आणि राक्षसी शक्ती असलेली रूपाली यांच्यातील वैर या मालिकेत पाहायला मिळाले. रूपालीचे निधन झाल्यानंतर तिची बहीण मैथिली नेत्राच्या आयुष्यात आली. तिच्या येण्यानेदेखील नेत्राच्या कुटुंबावर संकट आले होते.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत अभिनेत्री तितीक्षा तावडे नेत्रा या भूमिकेत दिसली होती. लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या रूपाली आणि मैथिली या दोन्ही पात्रांना प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळाले. तर, अद्वैत या भूमिकेत अभिनेता अजिंक्य ननावरे दिसला होता.

तितीक्षा तावडे काय म्हणाली?

आता ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे अभिनेत्री तितीक्षा तावडेने सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे काही व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. त्यामध्ये तिच्याबरोबर अभिनेत्री ऐश्वर्या नारकरदेखील दिसत आहेत. त्यावर नेत्रा आणि रूपाली असे लिहिले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, असा अध्याय जो संपला; पण आजही लक्षात आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना तितीक्षाने ऐश्वर्या नारकर यांनादेखील टॅग केले आहे. या व्हिडीओवर ऐश्वर्या नारकर यांनी कमेंट करीत हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. तर अभिनेत्रीने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी या मालिकेची आठवण येत असल्याचे म्हटले. अनेकांनी या मालिकेचे दुसरा पर्व आणावे, अशी विनंती केली. तर काहींनी आजही ही मालिका बघत असल्याचेदेखील म्हटले.

नेटकरी काय म्हणाले?

“कृपया, दुसरे पर्व घेऊन पुन्हा या. Zee 5 वर आतासुद्धा जुने भाग डाऊनलोड करून बघतोय”, “दुसरे पर्व घेऊन परत या”, “आम्हाला तुम्हा सगळ्यांची आठवण येते. प्लीज मालिकेचे दुसरे पर्व घेऊन या”, “या मालिकेची आणि संपूर्ण टीमची आठवण येते”, “आम्हाला नेत्रा आणि संपूर्ण टीमची आठवण येते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मालिका संपली तरीही या मालिकेतील ऑफस्क्रीन एकमेकांशी उत्तम बॉण्डिंग असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा हे कलाकार एकमेकांबरोबर वेळ घालवत असल्याचे त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओंमधून पाहायला मिळते. आता हे कलाकार कोणत्या भूमिकेतून आणि कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.