सोशल मीडियावर नेहमीच अभिनेत्रींच्या फॅशन सेन्सची चर्चा होत असते. अनेक अभिनेत्री त्यांच्या हटके अंदाजात चाहत्यांवर छाप पाडत असतात. या यादीत आघाडीवर असलेले एक नावं म्हणजे उर्फी जावेद. अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशनसाठी कायम चर्चेत असते. तिचे कपडे आणि ड्रेसिंग स्टाईलमुळे उर्फी नेहमीच ट्रोलर्साच्या निशाण्यावर असते. जवळपास प्रत्येकवेळी तिला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल केले जाते. पण तसे जरी असले तरी तिच्या प्रसिद्धीवर याचा अजिबात परिणाम झालेला नाही. त्यामुळेच आता ती एका रिऍलिटी शोमध्ये झळकणार आहे.

आणखी वाचा : सई ताम्हणकरने सुरू केली नव्या लॉकडाऊनची तयारी, फोटो पोस्ट करत म्हणाली…

उर्फी आतापर्यंत फक्त सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होती. पण आता ती मोठ्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ‘एमटीव्ही’ वरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘स्प्लिट्सविला’मध्ये उर्फी दिसून येणार आहे. १२ नोव्हेंबरपासून ‘एमटीव्ही’वर हा कार्यक्रम सुरु होत आहे. हा शो मिळाल्यामुळे उर्फी खूप खुश आहे. यात ती अभिनेत्री सनी लिओनीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

या कार्यक्रमाबद्दल बोलताना ती म्हणाली, “मी अनेक वर्षांपासून ‘एमटीव्ही स्प्लिट्सविला’ बघत आले आहे आणि या कार्यक्रमाचा आपणही कधीतरी भाग व्हावं हे माझं बऱ्याच वर्षांपासूनचं स्वप्न होतं. त्यामुळे आता या कार्यक्रमासाठी माझी निवड होणं हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. मी खूप रोमँटिक आहे त्यामुळे मला ‘स्प्लिट्सविला’ हा माझ्यासाठी खूप छान अनुभव असणार आहे हे निश्चित आहे.” विशेष म्हणजे उर्फीचा एक्स बॉयफ्रेंड पारस कलनावत हा कालच ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमातून बाहेर पडला आणि कालच उर्फीची ‘स्प्लिट्सविला’मध्ये एंट्री झाली हा एक वेगळा योगायोगच म्हणावा लागेल.

हेही वाचा : ड्रेसला सेफ्टी पिन लावल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले “उर्फी जावेद…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्फीने आतापर्यंत ‘दुर्गा’, ‘सात फेरों की हेराफेरी’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां’, ‘डायन’, ‘रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यानंतर आता पुन्हा ती छोट्या पडद्यावरून भेटायला येणार असल्याने तिचे चाहते खुश झाले आहेत.