अभिनेता आदिनाथ कोठारेने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी सिनेसृष्टीतील एक नामवंत कुटुंब म्हणून कोठारे कुटुंबाची ओळख आहे. सध्याच्या घडीला छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांची निर्मिती कोठारे व्हिजन्सने केली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आदिनाथ कोठारेने त्यांनी निर्मिती केलेल्या मालिकांबाबत भाष्य केलं.

हेही वाचा : Video : “असं स्वागत व्हायला भाग्य लागतं!”, विमानतळावर स्वप्नील जोशीला मुलांनी दिलं गोड सरप्राईज

अभिनेता आदिनाथ कोठारेने नुकतीच ‘अजब गजब’ या पॉडकास्टला हजेरी लावली होती. यावेळी एकेकाळी ‘पछाडलेला’, ‘खबरदार’, ‘धडाकेबाज’ असे दमदार चित्रपट बनवणारं कोठारे व्हिजन्स मालिकांकडे कसं वळलं? असा प्रश्न आदिनाथला विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला, “‘मन उधाण वाऱ्याचे’ ही आमची पहिली मालिका होती. त्यानंतर प्रसारित झालेल्या ‘जय मल्हार’ या मालिकेमुळे कोठारे व्हिजन्सला एक वेगळी ओळख मिळाली. लोकांनी त्या मालिकेला भरभरून प्रतिसाद दिला होता.”

हेही वाचा : भारत, इंडिया, हिंदुस्थान अन्… रितेश देशमुखने देशाच्या नावांबद्दल घेतला पोल, चाहत्यांची कोणत्या नावाला पसंती? वाचा

कोठारे व्हिजन्स धार्मिक किंवा देवाशी संबंधित मालिकांवर का भर देत आहे? याबद्दल सांगताना आदिनाथ म्हणाला, “‘जय मल्हार’ या ऐतिहासिक मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे पुढे काही चॅनल्सनी स्वत:हून आमच्याकडे अशा स्वरुपाच्या मालिकांसाठी विचारणा केली होती. धार्मिक मालिका करताना त्यांचं कथानक, सेट, व्हीएफएक्स या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असतं. या सगळ्या गोष्टी आमच्याकडे उपलब्ध असल्याने एक चॅनलच्या टीममध्येही एक विश्वास निर्माण होतो. ‘जय मल्हार’पासून ही सुरुवात झाली आणि पुढे ‘विठू माऊली’, ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या.”

हेही वाचा : “महाराजांची वाघनखं आणताय त्यासाठी अभिनंदन, जमलं तर…”, नाना पाटेकरांनी सुधीर मुनगंटीवारांना लगावला टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’, ‘आई’, ‘माझी माणसं’ अशा कोठारे व्हिजन्सच्या अनेक मालिका घराघरांत लोकप्रिय ठरल्या आहेत.