लोकप्रिय वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चं १७वं पर्व सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. १५ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस’चं १७वं पर्व सुरू होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही स्पर्धकांची नाव निश्चित झाली आहेत. अशातच बिग बॉसच्या या आगामी पर्वात अडल्ट कंटेंट क्रिएटर आणि मिस इंडिया सहभागी होणार असल्याच समोर आलं आहे.
हेही वाचा – “डिशमध्ये एवढी अनास्था…” मुक्ता बर्वेला पोह्यांचा आला वाईट अनुभव, संताप व्यक्त करत म्हणाली..
यंदाच्या बिग बॉसची थीम खूप वेगळी आहे. सिंगल विरुद्ध कपल अशी ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाची थीम आहे. अंकिता लोखंडे आणि विक्की जैन हे शोचे पहिले निश्चित स्पर्धक आहे. याशिवाय कंवर ढिल्लो आणि ऋषभ जयसवाल यांचं देखील नाव निश्चित झालं आहे. आता आगामी पर्वात जबरदस्त एन्ट्री घेण्यासाठी अडल्ट कंटेंट क्रिएटर शिल्पा सेठी सुद्धा तयार असल्याच समोर आलं आहे.
हेही वाचा – Video: दादा कोंडकेंच्या गाण्यावर अंशुमन विचारेचा बायकोबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सनी लिओनी आणि पामेला एंडरसन यांच्यानंतर ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वात अडल्ट कंटेंट क्रिएटर शिल्पा सेठीची एन्ट्री होणार आहे. ‘किम कार्दशियन ऑफ इंडिया’ म्हणून तिला ओळखलं जात. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट या खूप चर्चेत असतात. शिल्पा व्यतिरिक्त अभिनेत्री आणि पूर्वाश्रमीची मिस इंडिया मनस्वी ममगई बिग बॉस शोमध्ये सहभागी होणार आहे.
दरम्यान, सिंगलच्या यादीत हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री इशा सिंह, इशा मालवीय, जय सोनी, समर्थ जुरेल, फहमान खान आणि लोकप्रिय युट्यूबर हर्ष बेनिवाल यांची नावं आहेत.