टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी सध्या तिच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेतेय. काही दिवसांपूर्वीच तिने बॉयफ्रेंड शाहनवाझ शेखशी कोर्ट मॅरेज केलं. अशाप्रकारे गुपचूप लग्न केल्यानंतर ती बरीच चर्चेतही आली होती. अनेकांना तर तिच्या लग्नाचे फोटो पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्काच बसला होता. कारण ती अभिनेता विशाल सिंहला डेट करत असल्याच्या चर्चा सुरुवातीला रंगल्या होत्या. पण आता देवोलिना आणि शाहनवाझ यांच्या लग्नानंतर बॉलिवूड अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आली आहे.
देवोलिना आणि शाहनवाझ यांच्या लग्नानंतर अभिनेता केआरकेने केलेलं ट्वीट बरंच चर्चेत आहे. देवोलिनाने अचानक लग्न करण्यावर केआरकेने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आपल्या एका ट्वीटमध्ये त्याने ६ दिवासांपूर्वीच देवोलिना विशालशी लग्न करण्यासाठी तयार होती असं म्हटलं आहे. केआरकेच्या मते विशाल आणि देवोलिना यांच्यात काहीतरी झाल्याने तिला शाहनवाझशी लग्न करावं लागलं.
आणखी वाचा-“देवोलिना भट्टाचार्जी अभिजीत बिचुकलेचे कपडे धुवायची”, राखी सावंतचा ‘बिग बॉस’च्या घरात खुलासा
केआरकेने त्याच्या ट्वीट करताना लिहिलं, “अगदी ६ दिवसांपूर्वीच देवोलिना विशाल सिंहशी लग्न करायला तयार होती. पण आता तिने शाहनवाज शेखशी लग्न केलं आहे. का? याचा अर्थ देवोलिना आणि विशाल यांच्यात काहीतरी घडलं आहे.”

याशिवाय आपल्या आणखी एका ट्वीटमधून त्याने देवोलिनाला खास अंदाजात लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिलं, “लग्न आणि पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा. पण विश्वास ठेव मी शाहनवाझपेक्षा १००० पटींनी चांगला होतो. पण मग तू मला नकार का दिलास?” त्याच्या या ट्वीटवर देवोलिनानेही प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिलं, “कारण मला १००० पटींनी चांगला नाही माझ्यासाठी बेस्ट व्यक्ती हवी होती आणि वहिनीचं हृदय तोडू शकत नव्हते मी.”

दरम्यान एकदा केआरकेने सोशल मीडियावरूनच देवोलिनाला प्रपोज केलं होतं. देवोलिना ‘बिग बॉस १३’मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी एका ट्वीटमध्ये केआरकेने तिचं कौतुक केलं होतं आणि तिला प्रपोज केलं होतं. एवढंच नाही तर तिच्याशी लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. मात्र देवोलिनाने त्याला नकार दिला होता.