मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार हे शहर सोडून गावी स्थायिक झाल्याचे दिसत आहेत. आता नुकताच एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ती शेती करताना दिसत आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रश्मी अनपट ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच रश्मीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती शेती लावताना दिसत आहे.
आणखी वाचा : “माझा आता कोणताही संबंध नाही…” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने दिला राजीनामा

या व्हिडीओत रश्मी ही चिखलात उभं राहून भाताची रोपं जमिनीत लावत आहेत. यावेळी तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. “काळी माती निळं पाणी हिरवं शिवार…” असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे.

रश्मीच्या या व्हिडीओवर प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “वाह खूप छान”, असे निवेदिता सराफ यांनी कमेंट करत म्हटले आहे.

आणखी वाचा : “माझ्यासाठी उभे न राहणारे लोक…” उर्मिला मातोंडकरचे मोठे वक्तव्य, म्हणाली, “काही राजकारणी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान रश्मी अनपटने अनेक मराठी मालिकामध्ये काम केले आहे. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ‘सुवासिनी’, ‘पुढचं पाऊल’, ‘फ्रेशर्स’, ‘अग्निहोत्र’, ‘अग्निहोत्र २’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली. सध्या ती ‘सन मराठी’च्या ‘शाब्बास सूनबाई’ या मालिकेत काम करत आहे.