Aishwarya and Avinash Narkar : २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जोगवा’ चित्रपटाचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला होता. दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या या चित्रपटात उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे, प्रिया बेर्डे, विनय आपटे, किशोर कदम अशा बऱ्याच दिग्गज कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटातील गाणी सर्वत्र विशेष लोकप्रिय आहेत. ‘जीव रंगला’, ‘लल्लाटी भंडार’ या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अगदी शाळेच्या स्नेहसंमेलनापासून ते नवरात्रीत देवीचा जागर करताना ‘लल्लाटी भंडार’ हे गाणं नेहमीच वाजवलं जातं. अशातच नारकर जोडप्याला सुद्धा या गाण्याची भुरळ पडली आहे.

ऐश्वर्या व अविनाश नारकर ( Aishwarya and Avinash Narkar ) यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सोशल मीडियावरील ट्रेंडिंग आणि प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेल्या विविध गाण्यांवर हे जोडपं रील्स व्हिडीओ बनवतं. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

हेही वाचा : “बाबा पहिल्यांदा मुंबईत आले तो क्षण…”, अंकिताची वडिलांसाठी भावुक पोस्ट; म्हणाली, “Bigg Boss मध्ये मला…”

नारकर जोडप्याच्या एनर्जीचं सर्वत्र कौतुक

‘लल्लाटी भंडार’ या गाण्यावर नारकर जोडप्याने जबरदस्त डान्स केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. दोघेही पारंपरिक पोशाख करून पूर्ण एनर्जीसह या गाण्यावर थिरकले आहेत.

नारकर जोडप्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “आयुष्य जगावं तर असं”, “तुम्ही दोघे एकमेकांना खरंच शोभता… तुमच्यातली १०% एनर्जी तरी आजच्या युथकडे असती, तर जग खूप वेगळं असतं.”, “अविनाश दादा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क”, “बाईईईई काय ती एनर्जी…जाळ आणि धूर” अशा कमेंट्स नारकर जोडप्याच्या चाहत्यांनी त्यांचा डान्स पाहून केल्या आहेत. या व्हिडीओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, अविनाश नारकर यांच्या एनर्जीचं सर्वत्र विशेष कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा : Video : बाबा सिद्दीकींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सलमान खान पोहोचला; भाईजानचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…

Aishwarya and Avinash Narkar
ऐश्वर्या व अविनाश नारकर ( Aishwarya and Avinash Narkar )

हेही वाचा : थिएटर रिकामी, ‘जिगरा’चं Fake कलेक्शन अन्…; प्रसिद्ध अभिनेत्रीचा आलिया भट्टवर मोठा आरोप! थेट फोटो शेअर करत म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या नारकर जोडप्याच्या ( Aishwarya and Avinash Narkar ) कामाबद्दल सांगायचं झालं तर, ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या ‘झी मराठी’वरील मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. तर, अविनाश नारकर नुकतेच ‘डंका हरी नामाचा’ या चित्रपटात झळकले होते.