Aishwarya And Avinash Narkar : मराठी कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून ऐश्वर्या व अविनाश नारकरांकडे पाहिलं जातं. मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमधून या जोडीने कायम प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. विविध ट्रेडिंग गाण्यांवर रील्स व्हिडीओ बनवणं याशिवाय या जोडप्याचं फोटोशूट सुद्धा इन्स्टाग्रामवर तेवढंच चर्चेत असतं. या दोघांनी नुकताच जोडीने एका तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्यासह या व्हिडीओमध्ये अभिनेत्री अश्विनी कासारने देखील जबरदस्त एनर्जीसह डान्स केला आहे. हे तिघे मिळून सध्या ट्रेंडिग असणाऱ्या तामिळ गाण्यावर थिरकले आहेत. ‘Sawadeeka’ असं या गाण्याचं नाव असून हे गाणं अनिरुद्ध रविचंदर, अँथनी दासन आणि अरिवू यांनी गायलं आहे. ‘विदामुयार्ची’ या तामिळ चित्रपटातलं हे गाणं आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Pooja Sawant First Makar Sankrant dance video
ऑस्ट्रेलियात पूजा सावंतचा बहिणीसह जबरदस्त डान्स! पहिल्या संक्रांतीला मराठमोळा साज, पाहा व्हिडीओ
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video
‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ

हेही वाचा : “क्षमता असूनही उमेशला मराठी सिनेमे ऑफर झाले नाहीत” प्रिया बापटने व्यक्त केली खंत; कलाकार म्हणून मांडलं प्रामाणिक मत

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनी अश्विनी कासारसह ‘Sawadeeka’ गाण्यावर तुफान एनर्जीसह डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला अभिनेत्रीने “२०२५ मध्ये एकत्र धमाल करताना…” असं कॅप्शन दिलं आहे. या तिघांची धमाल पाहून एका मराठी अभिनेत्रीने या व्हिडीओवर खास कमेंट केली आहे.

अभिनेत्री आकांक्षा गाडेने या व्हिडीओवर, “अरे हा ग्रुप कसा जॉईन करायचा. मला लाँच करा प्लीज तुमच्या रील्समध्ये…” अशी कमेंट करत या तिघांचं कौतुक केलं आहे. यावर अविनाश नारकरांनी आकांक्षाला “अगं… यु आर मोस्ट वेलकम डीअर” असा रिप्लाय दिला आहे. याशिवाय अन्य नेटकऱ्यांनी या जोडप्याचं भरभरून कौतुक केलं आहे.

हेही वाचा : तेजश्री प्रधानने मालिका सोडल्यावर ‘प्रेमाची गोष्ट’च्या सेटवर आली नवीन ‘मुक्ता’! शेअर केला स्क्रिप्टचा पहिला फोटो…

हेही वाचा : Bigg Boss 18: चाहत पांडेने स्वतः बॉयफ्रेंड असल्याचा केलेला खुलासा, कशिश कपूरला दाखवलेली साखरपुड्याची अंगठी, ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

aishwarya avinash narkar dance video
मराठी अभिनेत्रीची कमेंट

दरम्यान, ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, अभिनेते सध्या ‘स्टार प्रवाह’च्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. तर, ऐश्वर्या नारकरांची महत्त्वाची भूमिका असलेली ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता अभिनेत्री येत्या काळात कोणत्या प्रोजेक्टमध्ये झळकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader